सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दोंडाईचा नगरपालिकेने पुन्हा एकदा वराह उच्छादाचा त्रास केला कमी

आज दि.१२/८/२०२१ रोजी चैनी रोड ते गोपालपुरा परिसरातील वराहांची झाली उचलबांगडी

Nandurbar MH
  • Aug 13 2021 1:44PM


आज दि.१२/८/२०२१ रोजी चैनी रोड ते गोपालपुरा परिसरातील वराहांची झाली उचलबांगडी


गेल्या काही महिन्यात जनताभिमुख तक्रारीची दखल घेत दोंडाईचा नगरपालिकेने सबंधीत वराह मालकांवर गंभीर कारवाई करण्याचे आदेश वजा सूचना दिल्याने राऊळ नगरसह अनेक परिसरातून वराहांची (डुकरांची) संख्या ही वराह मालकाने कमी केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते। 
दोंडाईचा शहर परिसरात दोन ते तीन व्यक्ती हे वराह (डुक्कर) पालन करणारे वराह मालक असून त्यांनी ज्याचा-त्याचा एरिया ठरवून घेतला असल्याचे माहितीवरून समजते। नगरपालिका आरोग्य विभागाने  दोन ते तीन वर्षांच्या कार्यकाळात स्वच्छ व सुंदर शहर ही संकल्पना राबवित मोठया प्रमाणावर नागरिकांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ दिला यामुळे दोंडाईचा शहर हे हागणदारीमुक्त झाले। पूर्वी नद्या-नाल्यांमध्ये दिसणारे वराह हे एरवी गल्ली-बोळात दिसायला लागले आणि त्यांची संख्याही वाढली। याचा खूपच त्रास नागरिकांना होत असल्यामुळे नागरिकांनी नगरपालिका आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या, त्याअनुषंगाने आरोग्य विभागाने नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत संबंधीत वराह मालकांवर गंभीर कारवाई करण्याचे आदेश वजा सूचना दिल्यामुळे मागील महिन्यात एका वराह मालकाने राऊळ नगरसह अनेक परिसरातून आपल्या वराहांची संख्या कमी केली होती। पुन्हा एकदा  नगरपालिकेने कडक कारवाई केल्यामुळे चैनी रोड ते गोपालपुरा परिसरातील वराह मालकाने आपल्या वराहांची संख्या कमी केली व कमी करण्याचे काम सुरू ठेवले आहे, यामुळे संबंधीत परिसरातील नागरिकांची, वराहांच्या  होणाऱ्या त्रासापासून सुटका होईल।

शेवटी नागरिकांना एकचं विनंती आपल्या घरातील व किचन मधील कचरा उघड्यावर अथवा गटारीत न टाकता तो कचरा ओला व सुका  विलगीकरण करुन घंटागाडीत टाकावा जेणेकरून दोंडाईचा शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात आपला देखील हातभार लागेल।

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार