शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने शनिवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झालेले आहे. दोंडाईचा शहरातील चैनी रोड परिसरातून दोन्ही पुतळ्यांची मिरवणूक काढण्यात आली असून दोन्ही अश्वारूढ पुतळ्याचे सौंदर्यात भर घालणारा सुरतेच्या स्वारीत ऐतिहासिक घटनेचे स्मरण करून स्वागत करण्यात आले. दोंडाईचा शहरात या अश्वारुढ स्मारकांची भव्य मिरवणूक निघाली असून स्वागतासाठी दोंडाईचा शहरातील विविध भागात अंगणात रांगोळ्या टाकून फुलांची सजावट करून मिरवणुकीची शोभा वाढवण्यात आली.
दोंडाईचा शहरात या भव्य दिव्य मिरवणूक नाशिक येथील ढोल पथक आदिवासी नृत्य पंचवटी तलवार बाजी आदिवासी टिपरी पथक गोंधळी तुतारी होलार वाजंत्री व नंदुरबार वाजंत्री यांचा समावेश असून उत्साहात व जल्लोषात दोंडाईचा शहरातील शनी मंदिर पासून मिरवणुकीला सुरुवात झाली.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333