सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

साठ झाडांची कंत्तल तीन भावांना नवापूर कोर्टाने सुनावली 14 दिवसांची कोठडी

झाडं तोडल्याप्रकरणी तीन भावांना नवापूर कोर्टाने तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Nandurbar MH
  • Jul 3 2021 11:04AM


 नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे

झाडं तोडल्याप्रकरणी तीन भावांना नवापूर कोर्टाने तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 60 झाडांची कत्तल केल्याप्रकरणी नवापूर कोर्टाने हा दणका दिला आहे

झाडं तोडल्याप्रकरणी तीन भावांना तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 60 झाडांची कत्तल केल्याप्रकरणी नवापूर कोर्टाने हा दणका दिला आहे. आरोपी तीन भावांनी नवापूर तालुक्यातील प्रतापपूर जंगलात सागवान आणि कुडी जातीची 60 झाडं तोडली होती. याप्रकरणी नवापूर वन विभागाने गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने तिघांना 14 दिवसांची कोठडी सुनावली.

जंगलातील सागवान आणि कुडी जातीचे अवैधरित्या वृक्ष कत्तल केल्याने 17 हजारांचे नुकसान झाले आहे. संशयित आरोपी विलास गावीत, प्रवीण गावीत,अरविंद गावीत रा.बोरझर यांना त्यांचा राहत्या घराजवळून अटक करण्यात आली. त्यांचाविरोधात वन कायदेअंतर्गत गुन्हा नोंद केला. वनपाल बोरझर यांनी तिन्ही आरोपींना नवापूर न्यायालय येथे हजर केले.


काय आहे नेमकं प्रकरण? 
आरोपी तीन भाऊ विलास, प्रवीण आणि अरविंद गावीत हे तीन भाऊ हे नवापूर तालुक्यातील बोरझर गावात राहतात.  मात्र या भावांनी जवळच्या जंगलात मोठी वृक्षतोड केली. या तिघांनी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 60 झाडं तोडली. सागवान आणि कुडी या जातीची ही झाडं होती. सागवानाच्या लाकडाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या झाडांची कत्तल या तिघा भावांनी केली.

याबाबतची कुणकुण वन विभागाला लागली. वन विभागाने धडक कारवाई करुन तिघा भावांवर गुन्हा दाखल केला. पुढे त्यांना कोर्टात दाखल केल्यानंतर, कोर्टाने तिन्ही भावांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवलं

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार