सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यातील एक पर्यटनासाठी प्रसिध्द असलेले आणि एक तीर्थक्षेत्र असलेले ठिकाण म्हणजे प्रकाशा गावातील केदारेश्वर मंदिर.

ह्याच ठिकाणी शुभ प्रसंगी व विशेष दिवसी भक्त व पर्यटन प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित असता म्हणून ह्या ठिकाणी सर्व सुवी सुविधा स्वच्छता असणे गरजेचे आहे.

Nandurbar MH
  • Jul 10 2021 11:01AM

नमस्कार 

नंदुरबार जिल्ह्यातील एक पर्यटनासाठी प्रसिध्द असलेले आणि एक तीर्थक्षेत्र असलेले ठिकाण म्हणजे प्रकाशा गावातील केदारेश्वर मंदिर.
आणि हेच भक्तांसाठी धार्मिक व श्रद्धेचे ठिकाण ही आहे.

ह्याच ठिकाणी शुभ प्रसंगी व विशेष दिवसी भक्त व पर्यटन प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित असता म्हणून ह्या ठिकाणी सर्व सुवी सुविधा स्वच्छता असणे गरजेचे आहे.
पण या ठिकाणी सतत अस्वच्छता ही दिसून येते.

पवित्र तापी नदीचे हे पात्र पण या ठिकाणी घाण दुर्गंधी सतत असून खंडित देवी देवतांच्या मूर्ती व तसेच देवांचे फोटो फ्रेम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक ठेवून जात असतात त्या ही या ठिकाणी पडून आहेत.

संतांच्या स्पदस्पर्शाने पवित्र झालेल्या महाराष्ट्राच्या या भूमीत व एका तीर्थक्षेत्रा ठिकाणी असा देवी देवतांचा अपमान हा होत आहे.

खूप वेळा गावातील नागरिकांकडून स्वच्छता ही करण्यात आली तरी काही कालावधी नंतर अस्वच्छता आढळून येतेच.

आता तर या महामारी मुळे व लॉकडाऊन असल्याने या ठिकाणी अस्वच्छता खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतेय.

गावातील नागरिकांकडून मंदिराच्या ट्रस्ट व येथील अध्यक्षांना कळकळीची विनंती हीच आहे कि या ठिकाणी स्वच्छता करून व सर्व खंडित देवी देवतांच्या मूर्ती यांचे योग्य ते व्यवस्थापण करावे व स्वछता साठी कर्मचारी ही या ठिकाणी जोडून द्यावे ज्याने करून परत अस्वच्छता या ठिकाणी आढळुन येणार नाही.

आणि यातूनच प्रकाशा गाव व येथील तीर्थक्षेत्र केदारेश्वर मंदिराची अजून जास्त प्रसिद्ध संपुर्ण देशभर होईल. हीच या ठिकाणी विनंती आहे.

एक प्रकाशाकर...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार