सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्मार्ट सिटी निवड झालेल्या शहरांमध्ये समावेश असलेल्या संभाजीनगर शिवसेना वार्ड मधील ही स्थिती आहे

संभाजीनगर शिवसेना वार्ड मधील ही स्थिती आहे

Sudarshan MH
  • Dec 7 2020 5:58PM
रस्त्याची सगळी चाळण झाली आहे,
   रस्त्यावरील खड्डे बघून आपल्या सर्वांचा संताप होत असणार त्यामुळे अनेकदा अनेक तक्रारी ,   आंदोलन, असे झालेले आपण पाहिले असेल परंतु दिनांक 6/12/2020 रविवार रोजी संभाजीनगर शहरात आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले, एन 9 एम 2 रोड पासून अर्बन बाजार कडे जाणार हा रस्ता अत्यन्त रहदारीचा असून ह्या रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे आणि नागरिकांची खूप गैरसोय होत आहे,
हे भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी सौ पूजाताई सोनवणे यांच्या नजरेस पडले व त्यांनी आंदोलन करण्याचे ठरविले
खड्डेमय झालेल्या रस्त्यावर वृक्षारोपण आंदोलन केले
महाविकास आघाडीच्या सरकारने माझे घर माझी जवाबदारी हे अभियान सुरू केले तसेच माझा खड्डा माझी जवाबदारी हे अभियान सुरू करण्याची खरी गरज आहे, कारण आता रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता हेच कळेनासे झाले आहे,
आता जर वारंवार कळवून सुद्धा जर लोकप्रतीनिधीं रस्त्या बाबत  समस्यांकडे दुर्लक्ष करत असेल व असेच खड्डे वाढणार असतील तर यापुढे आमच्या तर्फे वृक्षारोपण करून खड्डयांचा सदुपयोग करण्यात येईल,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगर च्या रस्त्यासाठी शंभर कोटीचा निधी  मंजूर करून दिला होता परंतु शिवसेनेच्या नेत्यांनी त्याचे काय केले याचा जाब आम्ही विचारत आहोत अशी प्रतिक्रिया सौ.पूजाताई सोनवणे यांनी दिली.
ह्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सौ.मनीषा ताई भन्साळी शहर जिल्हा उपाध्यक्ष,सौ छाया खाजेकर,
सौ सरिताताई घोडतुरे,सौ.रोहिणीताई खैरे,श्री.राजेश पाटील,श्री.राजेश पळसकर,श्री.जीवकपाल हिवाराळे,श्री.श्रीचंद जाधव,सौ.संगीता ताई राऊत,सौ.लक्ष्मीताई गायकवाड,सौ.राणिताई बेह्रडे,श्री.प्रशांत मोदी,श्री.राजेश अधुरे,श्री.योगेश भाकरे,श्री.सचिन खेडकर,श्री.कैलास राऊत,श्री.विजय सरोदे,श्री.बंटी भंगुरे,श्री.मिलिंद खैरे,श्री.रोहित सोनवणे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार