एकवीस लाख रूपयांसह चोरट्यांनी एटीएम मशिनच उखडून नेले पैठण रोडवरील ढोरकीन येथील घटना
पैठण रोडवरील ढोरकीन येथील घटना
संभाजीनगर लाखो रूपयांसह चोरट्यांनी चक्क एटीएम मशिनच उखडून नेल्याची घटना पैठण रोडवरील ढोरकीन येथे घडली. चोरट्यांनी लंपास केलेल्या एटीएम मशिनमध्ये जवळपास २१ लाख ३ हजार ७०० रूपये होते. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे ढोरकीन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, जवळपास सव्वा वर्षापूर्वी चोरट्यांनी बीड बायपास रोडवरून एसबीआय बँकेचे एटीएम मशिन उखडून नेले होते. त्या प्रकरणाचा अद्याप पर्यंत तपास लागलेला नसतांना ही दुसरी घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर ते पैठण रोडवरील ढोरकीन गावाच्या मुख्य बाजारपेठेत इंडिया बॅकेचे एटीएम सेंटर आहे. गुरूवारी दुपारीच बँकेच्या अधिका-यांनी एटीएममध्ये रोकड भरली होती. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी २१ लाख रूपये असलेली एटीएम मशिन मुळासकट उखडून नेली. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याचे कर्मचारी गस्तीवर असतांना त्यांना एटीएम मशिन चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना देताच पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे , पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांच्यासह इंडिया बँकेचे अधिकारी देखील दाखल झाले.
या प्रकरणी इंडिया बँकेच्या अधिका-यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सव्वा वर्षापूर्वी चोरीला गेलेले एटीएम मशिन सापडेना
बीड बायपास रोडवरील देवळाई चौकात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन चोरट्यांनी १३ जुलै २०१९ च्या रात्री उखडून नेले होते. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी शोधण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. त्यातच जवळपास सव्वा वर्षानंतर चोरट्यांनी पुन्हा एकदा एटीएम मशिन उखडून नेत शहर पोलिसांसह ग्रामीण पोलिसांना खुले आव्हान दिले आ
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प