बेफाम वाळूट्रकने महिलेला चिरडले ; बालिकेसह बाईकचालक जखमी
नंदुरबार - भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळू वाहणाऱ्या ट्रकच्या मागील फाटकाचा फटका बसून दुचाकीवरील एक महिला जागीच मरण पावली. तर दुचाकी चालक आणि 4 वर्षीय बालिका गंभीर जखमी झाले.
नंदुरबार - भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळू वाहणाऱ्या ट्रकच्या मागील फाटकाचा फटका बसून दुचाकीवरील एक महिला जागीच मरण पावली. तर दुचाकी चालक आणि 4 वर्षीय बालिका गंभीर जखमी झाले.
विशेष असे की याच गावात दोन महिन्यापूर्वी सुसाट धावणारा डंपर घरात घुसून दोन जण चिरडल्याची घटना घडली होती. नंदुरबार साक्री रस्त्यावरील नांदरखेडा फाट्याजवळ आज दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता पुन्हा अपघात घडला. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील रहिवासी ज्ञानेश्वर भगवान माळी हे आपली आई आशाबाई आणि चार वर्षीय पुतणी यांना घेऊन दुचाकीने नंदुरबारहून निजामपूरकडे जात होते. तेव्हा नंदुरबार-साक्री रस्त्यावर एम एच 15 एच बी 6399 ही वाळू वाहणारी ट्रक अत्यंत वेगाने मागून आली. त्यांच्या दुचाकीजवळून भरधाव जातांना त्या ट्रकचे मागील फाटक उधळले. त्याचा जोरदार फटका आशाबाई यांना बसताच दुचाकीसह तिघेही फेकले गेले. त्यात ज्ञानेश्वर भगवान माळी आणि ती बालिका गंभीर जखमी झाले तर आशाबाई भगवान माळी जागीच मरण पावल्या. अन्य वाहनधारकांनी तातडीने त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पसार होऊ पाहणाऱ्या ट्रक चालकाला ट्रक सह पकडले. अपघात करणाऱ्या ट्रकला मागील बाजूने नंबर प्लेटच नाही. यावरून वाळू तस्करी करणारे भरदिवसा पोलीस आणि आरटीओ कर्मचारी यांच्याा डोळ्यात धूळफेक करतात हे स्पष्ट झाले. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रियाा चालू होती. घटना समजल्यावर माळी वाडा परिसरात वाळू माफिया विरूद्ध संतापाची लाट उसळली. त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
नंदुरबार तालुक्यात मागील दीज वर्षात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या अपघातांचा क्रम सातत्याने सुरू आहे. त्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी- दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री नांदरखेडा फाटा पासून जवळच्या एका घरात रस्त्यावरून भरधाव वेगात चाललेला एम एच 39 पी 8194 क्रमांकाचा वाळू वाहून नेणारा आयवा ट्रक भिंत फोडून घुसला होता. प्रवीण राठोड आणि विक्रम जाधव हे दोन्ही तरुण झोपलेले असतानाच चिरडून मेले होते. अंगणात लावलेली एम एच 04 जेके 54 55 क्रमांकाची मोटरसायकल सुद्धा डंपरखाली चेंदामेंदा झाली होती. भरधाव वेगात वाहणाऱ्या वाळू गाड्यांबद्दल लोकांनी तेव्हाही प्रचंड संताप व्यक्त केला होता. त्याच्या आधी सुद्धा वेगाने धावणाऱ्या वाळू वाहणाऱ्या गाड्यांमुळे अनेक अपघात झाले. काही जणांनी प्राण गमावले. रेतीच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा आजही गंभीर आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादाने तापी पात्रातून रात्रंदिवस अवैध उपसा केला जातो. पोलिसांच्या नाकावर टिच्चून रोज शेकडोच्या संख्येने डंपर जात असतात. नंदुरबारची रेती तस्करी राज्यव्यापी असून प्रशासन कोणतेही नियंत्रण करू शकलेले नाही. आजच्या अपघातामुळे पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प