सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाहीतर आम्हीही दुकाने उघडणार,व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय.

Sudarshan MH
  • Apr 14 2021 1:49PM

संभाजीनगर
 देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे.
एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसरीकडे राज्य सरकार पुन्हा टाळेबंदी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे. राज्यसरकारच्या धरसोड वृत्तीमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला असून व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिक मोठे अस्वस्थ झाले असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकानांना बंदीचे आदेश दिले आहेत. या निर्बंधांमुळे संभाजीनगर व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून सरकारच्या नियमांविरोधात जाऊन दुकाने उघडण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला होता.
या पार्श्वभूमीवर काही निवडणूक व्यापारी संघटेनच्या सभासदांना काल पुण्याचे विभागीय आयक्त सौरभ राव यांनी चर्चेसाठी बोलावलं होतं. यावेळी व्यापाऱ्यांनी आपली व्यथा मांडली. गेले आठवडाभर दुकाने बंद असून देखील रुग्णसंख्येवर परिणाम झालेला नाही. रुग्णसंख्येचा आलेख हा वाढतच आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होण्यापेक्षा योग्य खबरदारी बाळगून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच, ई-कॉमर्स(फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, आदी) व्यवसाय सुरु आहेत. त्यांच्या डिलिव्हरी देखील सुरु आहे यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. जर बंद करायचेच असेल तर सरसकट बंदी घालून लॉकडाऊन करावा, अन्यथा आक्रोश होऊन दुकाने उघडावी लागतील, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार