सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हिंगणा एमआयडीसी मधील स्पेसवूड कंपनीला मोठी आग दिड तासापासून अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू

आजुबाजूच्या कंपन्यांना अद्याप तरी कोणताही धोका नाही आगीत सध्यातरी कोणतीही जिवीत हानी नाही

Snehal Joshi
  • Dec 29 2020 7:06PM
नागपुर दि २९ 

नागपुरातील हिंगणा औद्योगीक वसाहतीत मध्ये असलेल्या एका फर्निचर कंपनीला दुपारी साडे चार च्या सुमारास मोठी आग लागली आहे. स्पेसवूड नामक ही कंपनी आहे. आज सायंकाळच्या सुमारास साडे चार वाजता अचानक मोठी आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपुर महापालिकेचे अग्निशमन दलाच्या पथकांनी पाण्याचा जोरदार मारा सुरू केला आहे. आगीनं रौद्र रूप धारण केल्याने लांब अंतरावरूनही आगीचे आणि धुराचे लोट दिसतायेत. आगीच्या घटनेनंतर तुर्तास तरी कोणत्याही जिवित हानीची अद्याप तरी महिती नाही. ज्या कंपनीत आग लागली त्या कंपनीत लाकुड मोठ्या प्रमाणात असल्याने आग अतिशय वेगाने पसरली आहे.
आग विझविण्याचे प्रयत्न युध्दस्तरावर सुरू आहे. अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग स्पेसवूड कंपनी पुरती मर्यादीत ठेवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. स्पेसवूड कंपनीच्या अवतीभवती ही आग पसरली नाही. सुमारे दिड तासापासून अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांचे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार