सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्वातंत्र्योत्तर काळापासुन रखडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला

रखडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला

Sudarshan MH
  • Nov 23 2020 4:27PM

अहमदनगर

(रावसाहेब पारधी)

संगमनेर-पारनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असणार छोटसं (काळेवाडी)देसवडे गाव आहे या गावची मुख्य बाजारपेठ संगमनेर तालुक्यातील साकुर हे गाव आहे या गावांमध्ये तीनशे मीटर उंचीचा डोंगर आहे, पुर्वीच्या काळी रखरखत्या उन्हात माता-भगिनी पिण्याचे पाणी पायथ्याकडुन माथ्यावर घेऊन जात त्यामुळे या पाऊलवाटेला पान घाट अशी ओळख  मिळाली.
दहा मिनिटाच्या अंतरावरचं साकुर पण दळणवळणाच्या दृष्टीने खूप अडचणीचे आहे देसवडे-मांडवे कडून  साकुर ला पोहोचण्यासाठी 45 मिनिटे लागतात तर टेकडवाडीकडून साकुर ला पोहोचण्यासाठी १तास १५ मिनिटे लागतात. शेतकऱ्यांना खताच्या गोण्या फवारणी औषध आणण्यासाठी आठवड्यातून तीन-चार वेळा जावे लागते.
नदीकाठी राहणाऱ्या लोकांची शेती पठारावरती आहे तर पठारावर राहणाऱ्या लोकांची शेती नदीकाठी आहे. शेती अवजारे ने-आण करण्यासाठी, शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय याघाटामुळे दूर होईल. साकुर,काळेवाडी,पोखरी,म्हसोबा झाप आणि आणे या गावांना जाण्यासाठी पानघाट महत्त्वाचा ठरेल संगमने-साकुर एसटी पोखरी ला जाऊ शकते तर पोखरीत थांबणारी नारायणगाव-पोखरी, पुणे-पोखरी, नगर-पोखरी या एसटी साकुर ला जाऊ शकतील आणि खर्या अर्थाने दुर्लक्षित असणारा परिसर विकसित होईल. ग्रामस्थांचे,विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेता, दळणवळण विषयीचेसदर घाटाचे काम व्हावे, असा चंग मनाशी बांधुन ह.भ.प.शिवाजी महाराज दाते यांनी मनातील खदखद शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांच्याजवळ बोलुन दाखवली, त्यानंतर सुरू झाला पानघाटासाठी पाठपुरावा मग कधी पारनेर तर कधी नगर, लोकप्रतिनिधीपर्यंत हा विषय पोहोचला, सदर घाटाचे महत्व सरांनाही पटले, लहानपणी ते सुद्धा पायवाटेने या ठिकाणाहून गेलेले, लहानपणी बघीतलेले रस्त्याचे स्वप्न आज पुर्ण करण्याचे भाग्य मला मिळाले हे माझे भाग्य असे शुभारंभ प्रसंंगी आवर्जुन उल्लेख सभापती महोदयांनी बोलुन दाखवला. भाऊसाहेब टेकुडे कार्यक्रम प्रसंगी बोलताना म्हणाले कि दाते साहेबांनी आम्हां शेतकऱ्यांच्या पाईपलाईन साठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवल्या आणि आता रस्त्याचा प्रश्नदेखील सोडवला त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.
            या घाटाच्या उद्घाटनप्रसंगी श्री.काशीनाथ दाते सर
क्रुषी व बांधकाम सभापती,जिल्हा परिषद अ.नगर, मा.रामदास भोसले शिवसेना उपजिल्हा प्रमुख,
शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील
संस्थापक/प्रदेशाध्यक्ष
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य,
हभप शिवाजी महाराज दाते,
देसवडेचे उपसरपंच बबनराव शिंदे,बाळासाहेब भोर (संचालक देसवडे सोसायटी),निलेश भोर(पारनेर तालुका संघटक,शिवप्रतिष्ठाण),शिवनाथ नाईकवाडी(संगमनेर तालुका संघटक,शिवप्रतिष्ठाण), ज्ञानदेव दाते(सदस्य, ग्रा.प.देसवडे),युवानेते प्रविण भोर
संपत तोडकर, शिवाजी गुंड, बबन गुंड, गोविंद औटी, पांडूरंग गुंड, बंडू औटी, दीपक गुंड, सुर्यभान दाते, तुकाराम दाते, प्रकाश टेकुडे, धोंडीभाऊ दाते, शिवाजी तोडकर, ज्ञानदेव दाते, अमोल गुंड, रमेश दाते, दत्ता फटांगरे, रोहिदास दाते, प्रदीप गुंड, रामभाउ गुंड, राजेंद्र गुंड, कृष्णा दाते, गंगाराम टेकुडे, सकाहारी दाते, सुभाष दाते, शिवनाथ दाते, देवराम औटी आदी ग्रामस्थ उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार