सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लॉकडाऊन कालावधीत महिला व बालविकास कार्यालया अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखले 52 बालविवाह

संभाजीनगर कोरोना (कोविड-19) या विषाणुचा प्रादर्भाव दिवसागणिक वाढतच असुन जागतिक महामारी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.

Sudarshan MH
  • May 12 2021 11:07AM


 

         संभाजीनगर कोरोना (कोविड-19) या विषाणुचा प्रादर्भाव दिवसागणिक वाढतच असुन जागतिक महामारी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोराना विषाणुने पुन्हा नव्याने व्यापक स्वरुप घेतले आहे. परिणामी संपुर्ण अर्थव्यवस्था  व  समाज व्यवस्था प्रभावित झालेली आहे. अशा काळात संभाजीनगर जिल्हयात बालविवाहाचे प्रमाण दिवसागणिक वाढतच असुन कोरोना काळात एकुण 52 बालविवाह जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाने थांबवले आहेत. त्याच बरोबर काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना आश्रय,समुपदेशन देण्यात आलेले आहे.

सुनिल चव्हाण  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा बाल संरक्षण कक्ष संभाजीनगर यांचे बालविवाह बाबतीत संबंधीत यंत्रणा तात्काळ  समन्वय ठेवुन कार्यवाही  करण्यात यावेत अशा सुचना आहेत. तसेच सदस्य सचिव महाराष्ट्र यांचे देखील बाल कल्याण समिती, पोलीस उपनिरिक्षक,पोलीस अधिक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बालविाह प्रतिबंधक अधिाकरी तथा ग्रामसेवक, बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी  सेविका,ग्राम बालसंरक्षण समिती इत्यादींना आदेशित केलेले आहे कि अक्षय तृतीय मुहुर्तावर  राज्यात बालविवाह होणार नाहीत असा सर्व यंत्रणांनी  समन्वय ठेवुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशीत केले आहे.

        बाल न्याय मुलांची (काळजी व संरक्षण ) अधिनियम 2015 च्या कायदयाची  प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने  संभाजीनगर जिल्ह्यात कुठेही  बालविवाह होत असलेली माहितीच्या आधाराव  हर्षा देशमुख जिल्हा माहिला व बालविकास  अधिकारी  संभाजीनगर यांचे नेतृत्वाखाली तात्काळ पथक गठीत करण्यात येते व पोलीसांच्या मदतीने तातडीने घटना स्थळावर जावुन  संबंधीत  बालविवाह थांबवुन कायदेशिर प्रक्रिया  पुर्ण करुन बाल कल्याण समिती,संभाजीनगर यांचे समक्ष पुढील बालिकेचे पुनवर्सनला करिता सादर करण्यात येते. तसेच 3 जुन 2013 च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार  ग्रामीण भागासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी  म्हणुन ग्रामसेवक आणि सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणुन अंगणवाडी सेविका  तसेच शहरी भागासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणुन हे बालविकास प्रकल्प अधिकारी  हे 2016 च्या शासनाच्या अधिसुचनेत निर्देशित केलेले  आहेत.

       बालविवाह प्रतिबंधक अधिनियम -2006 अन्वये मुलीचे वय -18 वर्षे  व मुलाचे वय-21 वर्षे  पुर्ण होण्या अगोदर त्याचा विवाह  होत असेल किंवा झाला असेल  तरी त्यास बालविवाह  संबोधले जाते असा बालविाह  करणे हा कायदयाने  गुन्हा  असुन सदरचा गुन्हा हा अजामिणपात्र गुन्हा असुन त्यास 2 वर्षे सक्त मजुरी व 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होण्याचे प्रावधान आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार