सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत अभाविप धुळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांच्या माध्यमातून निवेदन...*

देशाभरात तसेच महाराष्ट्रामध्ये देखील कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे ताळेबंदी ही सातत्याने केली जात आहे.

Sudarshan MH
  • Jun 4 2021 1:54PM

देशाभरात तसेच महाराष्ट्रामध्ये देखील कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे ताळेबंदी ही सातत्याने केली जात आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन व आर्थिक स्थिती विस्कळीत झालेली आहे याचा परिणाम पालकांच्या रोजगार व उत्पन्नावर झालेला आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांकडून आकारले जाणारे भरमसाठ शैक्षणिक शुल्क पालकवर्ग शाळा व महाविद्यालयांना देण्यास सक्षम नाही. कोविडमुळे सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत असल्याने अनेक तांत्रिक समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत.

तरी मा.मुख्यमंत्री महोदयांनी खालील मागण्यांचा गांभीर्याने विचार करून मागण्यांची पूर्तता करावी. अन्यथा अभाविप महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपात आंदोलन करेल.

मागण्या :
१) शाळा व सर्व अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचे भरमसाठ असलेले शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे. ज्या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतलेला नाहीये अशा सुविधांचे शुल्क शैक्षणिक शुल्कामध्ये आकारले जाऊ नये. (उदा. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, जिमखाना, महाविद्यालय व शाळा विकास निधी, पार्किंग, ग्रंथालय शुल्क, इत्यादी.)

२)  सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होत असताना शुल्क हे ऑफलाईन परीक्षा पद्धती प्रमाणे आकारले जात आहे त्याच बरोबरीने शुल्कात प्रोजेक्ट शुल्क ही मोठ्या प्रमाणात आकारले जात आहे. त्यामुळे परीक्षा शुल्कात कपात करण्यात यावी.

३) ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झालेली नाही परंतु त्यांचे परीक्षा शुल्क हे घेण्यात आलेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क शासनाने तत्काळ परत करण्यासंदर्भातील सूचना ह्या संबंधित शाळा, महाविद्यालय व विद्यापीठांना देण्यात याव्यात.

४) क्रीडा क्षेत्रात आपलं भवितव्य उज्वल करण्याचे प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान या कोविड काळात झालेले आहे. मागील दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून कुठल्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा न झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांची क्रीडा प्रकारात सहभागी होण्याची वयोमर्यादा संपलेली आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी.

५) व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जागेवरील प्रवेश फेरी (स्पॉट राऊंड) मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार नाही असा शासन निर्णय आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करून त्या सर्व विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात यावी.

६) शैक्षणिक वर्ष २०१७-१८, २०१८-१९,  २०१९-२० व २०२०-२१ साठी पात्र असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांची सर्व विभागातील शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. तरी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी.

७) स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचे भरमसाठ असलेले शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे.

८) आरोग्य विभागाच्या दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या परीक्षांमध्ये अनेक गैरव्यवहार समोर आलेले आहेत आणि त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय देखील आरोग्य विभागाने घेतलेला आहे. परंतु या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेले आहे. त्यामुळे या परीक्षेवर अवलंबून असणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे तत्काळ पुन्हा परीक्षा घेण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना करण्यात याव्यात.

९) कोविडमुळे ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील यांचा मृत्यू झालेला आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा तसेच सर्व विद्यापीठांनी अशा विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना सुरू करून या अंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करावे.

१०) विद्यार्थ्यांना या कोविड  काळामध्ये अभ्यास करण्यासाठी पुरेसे साधने उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर अनेक अभ्यासक्रमांचे संदर्भ पुस्तके देखील उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सर्व विद्यापीठांनी ग्रंथालये ऑनलाईन उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांना संदर्भ पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास करता येणे शक्य होईल.

११) अनेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहल शुल्क आकारले जात आहे. या काळा नंतर कोणत्या प्रकारची सहल होणे शक्य नसल्याने या शैक्षणिक सहलीच्या नावे विद्यार्थ्यांची आर्थिक लूट ज्या महाविद्यालयांकडून केली जात आहे. अशा सर्व महाविद्यालयांनी संपूर्ण शैक्षणिक सहल शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्या संदर्भातची सूचना देण्यात याव्यात तसेच महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी.

१२) व्यवसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण देणारे अनेक महाविद्यालये या काळात बंद असतांना वसतिगृह शुल्क, पार्किंग शुल्क व भोजन शुल्क आकारत आहेत. जर विद्यार्थी महाविद्यालयातच आलेला नसेल तर अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करणाऱ्या महाविद्यालयांवर तत्काळ कारवाई करून विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क परत करण्यात यावे.

१३) असंख्य विद्यार्थी 'कमवा व शिका' योजने अंतर्गत आपले शिक्षण पूर्ण करत असतात, तरी महाविद्यालये सुरू झाल्यानंतर सद्यस्थिती पाहता 'मागेल त्याला काम' या अनुषंगाने कमवा व शिका योजने मध्ये काम देण्यात यावे, जेणेकरून आर्थिक कारणांमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही.

यावेळी अभाविप व धुळे शहर मंत्री भावेश भदाने ,वैष्णवी मराठे आदिती कुलकर्णी, आदिनाथ कोठावदे अनुज वाघ ,अविनाश उखंडे उपस्थित होते.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार