सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्य सरकारचे १५०० अजून आले नाहीत परंतु पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा ८ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा राज्य सरकारला टोला

मदतीचा एक छदामही न देणार्‍या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जनता नक्की धडा शिकवेल

Sudarshan MH
  • May 15 2021 4:33PM

====================
मदतीचा एक छदामही न देणार्‍या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जनता नक्की धडा शिकवेल
====================
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश शक्य असताना अव्वाच्या सव्वा बिले आकारून सर्वसामान्य लोकांना त्याचा फटका
====================

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब बांधवांसाठी रिक्षाचालक बांधकाम कामगार फेरीवाले यासारख्या बांधवांसाठी प्रत्येकी १५०० रुपये देण्याची पोकळ घोषणा केली होती पुढील ८ दिवसात- १५ दिवसात ही मदत संबंधित त्याच्या खात्यावर जमा होईल अशा वल्गना आघाडीच्या अनेक नेत्यांनी केल्या होत्या परंतु प्रत्यक्षात मात्र महा विकास आघाडी सरकारने नेहमीप्रमाणे धोकाच दिल्याचे निदर्शनास येत आहे याउलट देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी मात्र दिलेल्या शब्दाला जागत नेहमीप्रमाणे पंतप्रधान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी मदतीचा हात म्हणून दिला जाणारा नही आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना समर्पित केला पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी आज शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा ८ वा हप्ता प्रत्येकी २ हजार रुपये जमा केला. मोदीजीं चा नियमित आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला परंतु वसुली सरकारने घोषित केले १५०० रुपये मात्र अद्याप सर्वसामान्य व्यक्ती पर्यंत पोहोचले नाहीत असा ओला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लगावला.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांचा सन्मानार्थ व मदतीचा हात म्हणून पंतप्रधान सन्मान निधी दिला जातो हा निधी शेतकऱ्यांना देताना मोदी सरकारची संकल्पना व संकल्प दृढ होत असल्याचे दिसून येते परंतु राज्य सरकार मात्र केवळ पोकळ घोषणा करून सर्वसामान्य नागरिकांचा पैसा पॅकेज जाहीर करूनही त्यांच्यापर्यंत देत नाही ही बाब अत्यंत लाजिरवाणी असून सर्वसामान्य व्यक्ती महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची नीतिमत्ता नक्कीच लक्षात ठेवेल, केवळ पोकळ घोषणा करून मदतीचा एक छदामही न देणार्‍या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जनता नक्की धडा शिकवेल असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले

कोरोना महामारीच्या संकटात राज्यातील महा विकास आघाडी सरकारने शेतकरी बारा बलुतेदार यांच्यासह सर्वसामान्य लहान शेतकरी यापारी यांच्यासह कोणालाही मदत केलेली नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन २५ हजार- ५० हजार रुपयांच्या वेगवेगळ्या घोषणा झाल्या परंतु प्रत्यक्षात "राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला" अशीच शेतकऱ्यांची अवस्था राज्य सरकारने केली आहे मदत तर नाहीच उलट वाढीव वीज बिल, कोरोना संकटाच्या काळात वाढीव हॉस्पिटलमधील बिलं, कोरोना महामारीच्या काळात महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत कोरोना महामारी चा समावेश केला जाऊ शकत असताना देखील हॉस्पिटलच्या माध्यमातून अव्वाच्या सव्वा बिले वसूल करण्यात आले आणि त्याचा फटका मात्र सर्वसामान्य लोकांना बसला असा आरोपही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी केला

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार