जिल्हयातील समर्पित कोव्हीड रुग्णालयात वाढ
पालघर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून उपलब्ध असलेली सुविधा रुग्णांसाठी अपुरी पडत आहे.
पालघर - ( मनीष गुप्ता ) पालघर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून उपलब्ध असलेली सुविधा रुग्णांसाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधेवर ताण पडत असून जिल्हा शल्य चिकित्सक यांनी खाजगी रुग्णालयांनी कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयारी दर्शीविली असल्याचे सांगितले आहे.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी पालघर जिल्ह्यातील काही खाजगी रुग्णालयांमध्ये समर्पित कोव्हीड रुग्णालय म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी आदेश दिले आहेत.तर काही ग्रामीण रुग्णालयांमधील कोव्हीड बेड वाढवण्यात आले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.चंद्रकांत वाघमारे, पालघर प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र केळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, डहाणू तहसिलदार राहुल सारंग, तालुका आरोग्य अधिकारी पालघर डॉ.अभिजित खंदारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गाडेकर, गटविकास अधिकारी डहाणू बी.एच.भरक्षे, यांनी आज सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
अधिकारी लाईफ लाईन बेटेगाव बोईसर येथे ६० खाटांचे, फिलिया हॉस्पिटल ५० खाटा, वरद हॉस्पिटल बोईसर ५० खाटा, रिलीफ हॉस्पिटल पालघर ४० खाटा तर शारदा हॉस्पिटल विक्रमगड येथे ४० खाटांचे कोव्हीड केअर सेंटर तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
तर पालघर ग्रामीण रुग्णालय येथे २० खाटा उपलब्ध आहेत त्यात १० वाढवण्यात आल्या आहेत.डहाणू उपजिल्हा रुग्णालय येथे १६ खाटा आहेत त्यात १८ वाढवण्यात आल्या आहेत.तर वाणगाव ग्रामीण रुग्णालय येथे ३० खाटांची सुविधा आहे त्यात १० वाढवण्यात आल्या आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प