सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मिरचीचा असा बसला ठसका ,की बाजार समिती दोन दिवस बंद

नंदुरबार : गुरूवारी सकाळपासून दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवामान खात्यानेही दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविल्याने मिरची उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे

Nandurbar MH
  • Dec 12 2020 4:09PM
नंदुरबार : गुरूवारी सकाळपासून दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवामान खात्यानेही दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविल्याने मिरची उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. काल तोडणी केलेली मिरची शेतकऱ्यांनी आज बाजार समितीत विक्रीसाठी आणली होती. मात्र व्यापाऱ्यांकडून पावसाळी वातावरणामुळे ती खरेदीस नकार दिला गेला. दुपारपर्यंत मिरचीचा लिलाव रखडला होता. मात्र बाजार समिती प्रशासनाने मध्यस्थी करत दुपारनंतर मिरचीचा लिलाव करून शेतकऱ्यांना दिलासा दिला गेला. मात्र पुढील दोन दिवस मिरची व कापूस विक्रीस न आणण्याचे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

नंदुरबार हे मिरचीचे आगार मानले जाते.परंतु ढगाळ वातावरणामुळे मिरची खरेदी- विक्री करणे म्हणजे खूपच जोखमीचे मानले जाते. कारण घेतलेली मिरची ही ओली असते. ती वाळवावी लागते. मात्र ढगा वातावरणात ती पसरविली व पाऊस झाल्यास तिचे नुकसान होऊ शकते. किंवा ती गोडावनमध्ये साठविताही येत नाही. कारण ओलीमुळे तिला बुरशी लागते व ती काळीही पडते. तीच जोखीम शेतकऱ्यांनाही असते. मिरची तोडल्यानंतर तत्काळ विक्रीस आणली जाते. कालपर्यंत मोकळे वातावरण होते. उन्हाची तीव्रता होती. त्यातच मिरचीचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी ती तोडली व रात्रीच काहींनी पहाटे वाहने भरून बाजार समितीत आणली. मात्र गुरूवारी सूर्यदर्शन झाले नाही. सर्वत्र ढगाळ वातावरण होते. त्यातच हवामान खात्यानेही दोन दिवस असे वातावरण राहण्याची व पावसाची शक्यता वर्तविली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार