भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी संभाजीनगर ग्रामीण यांनी कलेक्टर तर्फे घोषित लॉक डाऊन हा व्यापारी वर्गावर अन्याय करणारा आहे अगोदरच वर्ष भरापासून कोरोना मुळे व्यापाऱ्यांचे अर्थ चक्र विस्कळीत झालेले आहे. वर्षभरातील बंद काळात सुध्धा बँकेचे हफ्ते त्यावरील व्याज, लाईट बिल, दुकान भाडे सरकारी अनेक प्रकारचा टॅक्स, नौकर वर्गा चा पगार, हा बंद काळातला सुध्दा भराव लागत आहे बँका कर्ज वसुली साठी नोटिसा पाठवत आहे MSEB लाईट कट करत आहे त्या मुळे व्यापारी वर्ग हा अगोदरच रसातळाला गेलेला असताना व शासना ला कोरोना ला रोखण्यात आले ल्या अपयशा वर पडदा टाकण्या साठी परत व्यापाऱ्यावर व जनतेवर लॉक डाऊन चे भूत उभे केले आहे लॉक डाऊन पर्याय नाही हे सरकारमधील नेते म्हणत असताना सुध्धा फक्त आणि फक्त शासनाचे अपयश झाकण्यााठी लावण्यात येत असलेल्या लॉक डाऊन चा भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी संभाजीनगर निषेध व्यक्त करून विरोध करीत आहे अश्या प्रकारचे निवेदन मा. सुनील चव्हाण जिल्हाधिकारी यांना दिले त्या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष- विनोद मंडलेचा, मराठवाडा संघटक मुकेश जैन,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत जाधवर, उपाध्यक्ष महेश श्रीकांत, चिटणीस संदीप मुथा हे उपस्थित होते