सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यातील कुख्यात गॅंगस्टार गजा मारणेला पुन्हा एक वर्षासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी केले गजाआड,

पुणे: कुख्यात गॅंगस्टार गजा मारणे हा काही दिवसांपूर्वीच

Sudarshan MH
  • Mar 8 2021 6:41AM
 
प्रतिनिधि:दिपक चव्हाण पुणे
 
 
पुणे: कुख्यात गॅंगस्टार गजा मारणे हा काही दिवसांपूर्वीच तळोजा जेलमधून जमीन वर सुटल्याने गजा मारणे व त्याच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात तळोजा जेल पासून पुण्यापर्यंत मोठ शक्ती प्रदर्शन करत मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वरील टोल प्लाझा मोठी दहशत करत नियमांचे उल्लंघन करत मोठे शक्तिप्रदर्शन केल्याने रायगड पोलीस,पुणे ग्रामीण पोलीस व पिंपरी चिंचवड पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले होता व त्याच्या विरोधात एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता त्या भितीने तो फरार झाले होता परन्तु गजा मारणे याला पुन्हा अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनाने चांगलीच कंबर कसली होती होत काल आखेर सातारा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पुणे ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत गॅंगस्टर गजा मराणेला मेढा येथून अटक करुन त्याला एका वर्षासाठी योरोडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
 
 
कुख्यात गेंगस्टार गजा मारणे याच्याविरोधात खून,दरोडा, खंडणी,खुनाचा प्रयत्न,दहशत निर्माण करणे असे एकूण 22,गंभीर गुन्हे दाखल असून त्याला 15 जानेवारी रोजी तळोदा जेल मधून सुटल्यानंतर त्याने परत मोठी दहशत निर्माण केल्यामुळे त्यावर पुन्हा सहा गुन्हे दाखल करण्यात आल्या मुळे त्याच्या विरोधात एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेचा प्रस्तावानुसार पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी 2 मार्च रोजी त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु तो कारवाईच्या धाकाने फरार झाला होता मात्र पुणे ग्रामीण पोलीस नेत्याच्या शोधात असल्याने काल रात्री सातारा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला गजाआड केले
 
सदर व कारवाई ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे,स्थानिक गुन्हे शाखेची टिम व पौड पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार