सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गुरे चारण्याच्या वादातून एकाच्या डोक्यात दगड घालून जखमी केल्याची घटना गौया येथे घडली.

गौऱ्या येथील घटना ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Nandurbar MH
  • Sep 11 2021 12:25PM


गौऱ्या येथील घटना ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
 नंदुरबार : शेतात चरणाऱ्या बैलास बांधून ठेवण्याचे सांगितल्याचा राग येऊन एकाच्या डोक्यात दगड घालून जखमी केल्याची घटना गौया, ता. धडगाव येथे घडली.

याप्रकरणी चार जणांविरुद्ध धडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौया येथील दातक्या राज्या पराडके यांचा मुलगा शेतात बैल चारत होता. त्यावेळी राजू वाण्या पराडके याने तेथून बैल काढून घे, भात पिकाचे नुकसान करतील म्हणून सांगितले. त्याचा राग दातक्या पराडके व इतरांना आला. सायंकाळी राजू वाण्या पराडके हा बसलेला असताना दातक्यासह चार जण तेथे आले. त्यांनी दगड उचलून राजू याच्या डोक्यात घातला तर इतर तिघांनी हातबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण सोडविण्यासाठी राजूचा भाऊ दिनेश तेथे गेला असता त्यालाही मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. जखमी राजू पराडके याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत दातक्या राज्या पराडके, समशा दातक्या पराडके, वसंत दातक्या पराडके, कालुसिंग दातक्या पराडके (सर्व रा. गौऱ्या, ता. धडगाव) यांच्याविरुद्ध धडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार स्वप्नील गोसावी करीत आहेत.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार