कोरोना मृतदेहासाठी रद्द करण्यात आलेल्या पोलिसांच्या NOCचा अजब अट्टहास!
कोविड 19 मृतदेहाची विल्हेवाट लावताना पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्राची मागणी न करण्याच्या परिपत्रकाला रुग्णालय प्रमुख जुमानत नाहीत.
कोविड 19 मृतदेहाची विल्हेवाट लावताना पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्राची मागणी न करण्याच्या परिपत्रकाला रुग्णालय प्रमुख जुमानत नाहीत. कोविडचे मृतदेह नातेवाईकांना सुपुर्द करण्यासाठी रद्दबातल करण्यात आलेल्या पोलिसांच्या NOC चा अजब अट्टहास सुरु आहे. याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त यांसकडे लेखी तक्रार केली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त यांसकडे पाठविलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे की 3 ऑगस्ट 2020 रोजी डॉ मंगला गोमारे यांनी अतिरिक्त आयुक्त यांच्या परवानगीने कोविड 19 मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्राची मागणी न करण्याबाबत परिपत्रक जारी केले. यापूर्वी पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्र शिवाय मृतदेह दिला जात नसे, या प्रकाराने मृतदेह रुग्णालयातून स्मशानभूमीमध्ये नेण्यास वेळ लागत असे. सार्वजनिक आरोग्य खात्याचे परिपत्रक स्वयंस्पष्ट असताना बीकेसी, सायन आणि टाटा रुग्णालयात पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्राचा अट्टहास केला जात असल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे.
अनिल गलगली यांनी त्या सर्व अधिकारी वर्गाची चौकशी करण्याची मागणी केली आहे जे पालिकेच्या परिपत्रकाला न जुमानता मृत्यूनंतर व्यक्तीच्या नातेवाईकांना क्षणोक्षणी त्रास देत आहे. परिपत्रक पालिकेचे असताना त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकारी वर्गावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प