सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

औषधीभवन पुलाखालीच कचर्‍याला आग

अग्निशमन जवानांनी पुलाचा काही भाग तोडून विझवली आग*

Sudarshan MH
  • Apr 5 2021 3:25PM
 
संभाजीनगर: जुन्या शहरातील औषधी भवन नाल्यातील कचर्‍यातच रविवारी दि.4 सकाळी अचानक आगीने भडका घेतला. पुलाखालीच ्रही आग लागल्यामुळे ती विझविणे अग्निशमन जवानांना कठीण जात होते. त्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने पुलाचा काही भाग फोडला, त्यानंतर ही आग आटोक्यात आली. यासाठी तब्बल सहा तास आणि नऊ बंब लागल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले.
औषधीभवनच्या पुलाखाली लागलेल्या या आगीत नाल्यातून निघणारे धुराचे लोळ बघून नागरिकांत एकच खळबळ उडाली. येथील करण गाडेकर यांनी आगीची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर लगेच काही मिनिटांनी अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. औषधी भवन रोडवरच असलेल्या ड्रेनेजचा ढापा बाजूला करत जवानांनी बंबाच्या सहाय्याने पाण्याचा फवारा मारायला सुरूवात केली. मात्र, नाल्यात अनेक वर्षांपासून तुंबलेल्या थर्माकोल, प्लास्टिकच्या कचर्‍याने पेट घेतल्याने नाल्यातच आग धुमसत होती. आग डोळ्यांनी दिसत नसली, तरी धुराच्या लोळवरुन भीषण रुप दिसून आले. दोन अग्निशमन बंबातील पाणी संपले तरी नाल्यातील आग धुमसतच होती. नाल्याखाली जाण्यासाठी दुसरा मार्ग ही नव्हता. अखेर जेसीबीच्या सहाय्याने पुलाचा काही भाग फोडण्यात आला. 
 
सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कसरत : अग्निशमन जवानांना तब्बल सहा तास आग विझवण्यासाठी कसरत करावी लागली. सांयकाळी साडेपाच वाजता विझवण्यात जवानांना यश आले. तोपर्यंत दोन अग्निशमन बंबाच्या नऊ फेर्‍या झाल्या होत्या. मात्र, नाल्याखालून धुर निघतच होता. त्यामुळे उद्या सकाळी पुन्हा बघू, असे सांगून अग्निशमनचे जवान निघून गेल्याचे नागरिकांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार