सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक चक्र विस्कळीत झाल्यामुळे उमरखेड नगरपरिषदेमार्फत आकारण्यात येणारा वाणिज्य आणि घराचा एक वर्षाचा कर माफ करण्यासाठी मुख्याधिकारी श्री.चारुदत्त इंगुले यांना निवेदन*

मार्च 2020 पासून कोरोनाच्या प्रभावाने जगभरात आर्थिक चक्र विस्कळीत होत आहे. दिवसेंदिवस या महामारीच्या प्रभावाचे परिणाम कमी होण्यापेक्षा वाढतंच चालल्याचे चित्र आहे.

Sudarshan MH
  • Apr 30 2021 3:46PM

      
उमरखेड- *प्रतिनिधी किरण मुक्कावार*

मार्च 2020 पासून कोरोनाच्या प्रभावाने जगभरात आर्थिक चक्र विस्कळीत होत आहे. दिवसेंदिवस या महामारीच्या प्रभावाचे परिणाम कमी होण्यापेक्षा वाढतंच चालल्याचे चित्र आहे. 2021 मधील सध्याच्या लाटेने तर मृत्यदरात लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. लोकांनी आपल्या परिवारातील सदस्य  किंवा मित्रपरिवारातील कोणीतरी जवळचा गमावला आहे.
सगळ्यात मोठा परिणाम झाला तो ग्रामीण भागापासून ते शहरातील सर्व स्तरातील अर्थव्यवस्थेवर आणि लोकांच्या रोजगारावर. 
 उमरखेड मध्ये जेव्हा जेव्हा प्रशासनाने अवाहन केले तेव्हा परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी शहरातील सुजाण नागरिक, व्यापारी व उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीने बंद, लॉकडाऊन, जनता कर्फ्यु पाळून आपापल्या परीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हातभार लावला. हे सगळं करीत असताना त्यांच्या उद्योगधंद्यांवर, रोजगारावर परिणाम होऊन त्यांना नुकसान सोसावे लागले, त्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली.
हे जरी खरं असलं तरी नगर पालिकेचे टॅक्स, वीजबिल, दुकानांची भाडी त्यांनी मागच्या वर्षी नियमितपणे भरली. 
ग्रामीण भागातील तरुण ज्यांनी शहरात येऊन आपले रोजगार, उद्योग सुरू केले त्यांची तर परिस्थिती फार बिकट बनत चालली आहे.
याच सर्वसामान्य माणसाला दिलासा देता यावा यासाठी नगरपालिकेने यावर्षी चा वाणिज्य व घर टॅक्स  माफ करावा यासाठीचे निवेदन उमरखेड काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या समवेत मुख्याधिकारी श्री. चारुदत्त इंगुले यांना देण्यात आले.
यावेळी मुख्याधिकाऱ्यांशी उमरखेड शहरातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. लोकांचे उत्पन्नाचे स्रोत कमी झालेत त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी हे टॅक्स माफ करणे गरजेचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. लोकं जिवंत राहिली पाहिजेत त्यांचे उद्योगधंदे जिवंत राहिले पाहिजे यासाठी नगरपालिकेच्या या निर्णयामुळे हातभार लागेल अशा आशयाची विनंती या निवेदनाच्या द्वारे मुख्याधिकारी यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष जे की उमरखेड मतदारसंघाचे आमदार देखील आहेत त्यांना व सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांना केली.
  आपत्कालीन परिस्थितीत कामी पडतील यासाठी उमरखेड नगरपालिकेच्या आधीच्या सत्ताधाऱ्यांनी मोठी रक्कम फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलेली होती त्यात आता बरीच वाढ झालेली असेल. सद्यस्थितीत आलेल्या गंभीर संकटकाळी ही रक्कम वापरून सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
#राम_देवसरकर

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार