म्हसावद:(प्रतिनिधी)-
शहादा तालुक्यातील कुसुमवाडा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या कलावती फाउंडेशन सोमावल मार्फत शेतकऱ्यांसाठी शेतात जाण्या येण्यासाठी तीन की.मी.रस्त्याचे बांधकाम करण्या चे उदघाटन गावाचे प्रथम नागरिक सरपंच सौ.सिंधू बाई दिलीप पवार यांच्या हस्ते आज दि.14 ऑगस्ट रोजी करण्यात आले.आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या आमदार निधीतून कुसुमवाडा गाव अंतर्गत कुसुमवाडा ते भुतेआकसपूर या तीन किमी रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.या रस्त्या चे उपयोगी म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये जा करण्यासाठी,आपल्या शेतात खत बियाणे घेऊन जाण्यासाठी,उसाच्या ने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली,ट्रक आदी वाहन आपल्या शेतात जाण्यासाठी उपयोगी पडेल म्हणून आमदार पाडवी यांनी आपल्या आमदार निधी तुन निधी उपलबद्धता करून दिले .यावेळी सामाजिक कारकर्ते दिलीप पवार,ग्रामपंचायत सल्लागार कालिदास शेमळे,उपसरपंच सौ.अनिता वाघ.माजी उप सरपंच चिमण बन्सी शेमळे,कलावती फाउंडेशन चे समन्वयक गोपाल पावरा व करमसिंग अहेर,कलीबाई शेमळे,राजेंद्र ठाकरे,सुभाष ठाकरे,रामचंद्र राठोड,एकनाथ राठोड यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333