सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून नागरिकांकडून नियमांना दिला जात आहे खो...

कोरोना अलर्ट : प्राप्त ३८७ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर ११० पॉझिटिव्ह • ४६ रूग्णांना मिळाली सुट्टी

Sudarshan MH
  • Feb 15 2021 3:20PM

 

(योगेश शर्मा)

 

बुलडाणा : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना वायरसने ग्रस्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असतांना बुलढाणा जिल्ह्यात मात्र शासनाने लावून दिलेल्या नियमांनाच नागरिक खो देत असल्याचे समोर येत असून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. अश्यातच वेळेतच या प्रकाराबद्दल प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कठोर पावले उचलली नाहीत तर सर्वसामान्यांपर्यंत कोरोनाची प्रतिबंधक लस पोहचेपर्यंत या वायरसने आपला प्रसार चांगलाच वाढवलेला असेल, आणि याला वाढण्यासाठी येथील नागरिक देखील तेव्हडेच जबाबदार असणार यात कुठलीही शंका नाही.

नुकतेच प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५०४ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३८७ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ११० अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ७१ व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील ३९ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील २६१ तर रॅपिड टेस्टमधील १२६ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ३८७ अहवाल निगेटीव्ह आहेत. 

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा विचार केला तर प्रत्येक तालुक्यात कोरोनाने आपला प्रसार चांगलाच केलेला आहे. दिनांक १४ फेब्रुवारी रोजी पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढील प्रमाणे पुढीलप्रमाणे : चिखली शहर : २७, चिखली तालुका : हातनी २, कोलारा १, अंत्रिकोळी १, अमडापुर ३, अंचरवाडी २, खंडाळा २, भोकरवडी १, जांभोरा १, पाटोदा १, भालगाव २, दे. राजा शहर : ९, दे. राजा तालुका : सिनगाव जहागीर २, डोढरा १, गिरोली बु १, सिं. राजा तालुका : साखरखर्डा ३, सिंदखेड राजा शहर : १, लोणार तालुका : अंजनी खु १, बुलडाणा तालुका : अजीसपुर १, बुलडाणा शहर : २४, जळगांव जामोद तालुका : वाडी १, खामगांव शहर : १०, मलकापूर शहर : १, मलकापूर तालुका : मोरखेड १, लासुरा १, मोताळा तालुका : मूर्ती १, खामगाव तालुका : लखनवाडा खू २, सुटाला १, हिवरखेड खू १, नांदुरा शहर : २, नांदुरा तालुका : पिंप्री अढाव १, मूळ पत्ता धावडा ता. भोकरदन जि. जालना १, जळगाव १ संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात ९१ रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे मोताळा येथील ६३ वर्षीय पुरुष रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

      तसेच आज ४६ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : २, चिखली : ५, दे. राजा : १२, बुलडाणा : अपंग विद्यालय १३, लोणार : १, शेगांव : ५ नांदुरा : १, सिंदखेड राजा : १, मलकापूर : ५, जळगाव जामोद : १.

  तसेच आजपर्यंत ११५०२१ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १४११५ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या १४११५ आहे.  

  तसेच ८८७ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ११५०२१ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १४८१५ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी १४११५ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ५२३ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १७७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

दररोज अश्याप्रकारे कोरनाबद्दल संपुर्ण माहीती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दिली जात आहे. ही माहिती घेतल्यावर स्थानिक लोकांमध्ये केवळ या बद्दल चर्चा होऊन लोक गंभीर नाहीत अशा बतावण्या केल्या जात आहे.


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार