सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*नंदुरबार: रेमडेसिव्हीरच्या काळाबाजाराला जिल्हाधिकारी जबाबदार- खा.डॉ. हिना गावित*

नंदुरबार - रेमडेसिव्हीर इंजेक्शन वितरणातील काळ्या बाजाराला जिल्हाधिकारी व अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जबाबदार असून आपण पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांकडे त्यांची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे खा.डॉ. हिना गावित यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

Nandurbar MH
  • Apr 17 2021 11:46AM
सुदर्शन न्युज- केतन रघुवंशी (नंदुरबार)
नंदुरबार - रेमडेसिव्हीर इंजेक्शन वितरणातील काळ्या बाजाराला जिल्हाधिकारी व अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जबाबदार असून आपण पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांकडे त्यांची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे खा.डॉ. हिना गावित यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
चार दिवसांपूर्वीच खासदार डॉक्टर हिना गावित राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना उद्रेकाला जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांची नियोजन नसलेली हाताळणीच जबाबदार असल्याचा आरोप जाहीरपणे केला होता. त्यापाठोपाठ आज दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी रेमडीसीवरच्या काळाबाजाराला जिल्हा अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला. 
 जिल्हा प्रशासनाने  दि. 14 रोजी या विषयावर खुलासा करताना म्हटले होते की, जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात दाखल कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनातर्फे खाजगी वितरकाच्या माध्यमातून  तीन दिवसात रेमडिसीवीर औषधाच्या 476 मात्रा खाजगी रुग्णालयांना वितरीत करण्यात आल्या आहेत. रेमडिसीवीरच्या तुटवड्याच्या आणि अनियमित वितरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खाजगी  रुग्णालयांना केंद्रीत पद्धतीने रेमडिसीवीर औषध पुरविण्याचा निर्णय घेतला होता. सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन  यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार  प्रशासनाकडील 500 मात्रादेखील खाजगी रुग्णालयांसाठी देण्यात आल्या आहेत.  जिल्हा प्रशासनाकडे शासकीय  कोविड रुग्णालयातील रुग्णांसाठी रेमडिसीवीरच्या 938 मात्रा शिल्लक असल्याचे पुढे म्हटले होते. त्यापाठोपाठ दि. 15  रोजी वाटपाचेे विवरण दिलेल्या माहितीत म्हटले होते की, जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात दाखल कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनातर्फे खाजगी वितरकाच्या माध्यमातून दोन दिवसात रेमडिसीवीर औषधाच्या 218 मात्रा खाजगी रुग्णालयांना वितरीत करण्यात आल्या. 
सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्या नियंत्रणाखाली हे वितरण करण्यात आले आहे. 
पत्रकार परिषदेत  या माहितीचा समाचार घेताना त्या म्हणाल्या की, कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शन वेळेत मिळत नसल्याने अनेक रुग्ण दगावले आहेत. इंजेक्शन पुरवठा करण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे नियोजन चुकल्याने नंदुरबारसाठी मिळणारे इंजेक्शन थेट पुणे मुंबईसारख्या शहरात जात असल्याचा आरोपही खा.डॉ.हिना गावित यांनी केला. कोविड रुग्णालयांसाठी इंजेक्शनचा पुरवठा केल्याची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसारित केली आहे. ती चक्क दिशाभूल करणारी आहे. प्रत्यक्षात रुग्णालयांना कमी प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. मात्र, जिल्हा प्रशासनाने ती आकडेवारी मोठ्या प्रमाणावर दाखवून दिशाभूल केली आहे, असे याप्रसंगी डॉक्टर हिना गावित म्हणाल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार