तळोदा प्रतिनिधी :- अक्षय भगवान कलाल
इंधनाच्या भरमसाठ भाव वाढीविरोधात तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केंद्र शासनाच्या विरोधात निषेध व्यक्त करत शहरातील बिरसा मुंडा चौक ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला होता. यावेळी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजातील ध्वनिफीत ध्वनिक्षेपकावर ऐकवण्यात येत होती. निषेध मोर्चात बैलगाडी त्यावरील दुचाकीव दुचाकीवर गॅस सिलेंडर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. तहसील कार्यालयात कार्यकर्त्यांनी तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन दिले. मोर्चात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. पुंडलिक राजपूत, शहराध्यक्ष योगेश मराठे, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, ज्येष्ठ नेते केसरसिंग क्षत्रिय, ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप परदेशी, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम चव्हाण व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
निषेध मोर्चातील "या" कारणाने नागरिकांचे वेधले लक्ष
निषेध मोर्चा राष्ट्रवादीचा व त्यात ध्वनिक्षेपकाद्वारे ध्वनिफीतीत आवाज मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा... पेट्रोल के दाम कम हुए की नही हुए....? असे विचारल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्ता द्वारे नाही असं घोषणा देण्यात येत होत्या. कार्यकर्त्यांच्या अश्या कल्पक दृष्टी मुळे नागरिकांचे ह्या मोर्चाने लक्ष वेधून घेतले होते.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333