सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर तर्फे निषेध..

दोन दिवसात महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन गुंडाळण्यात येत असून अधिवेशनात भाजप च्या १२ आमदारांचे १ वर्षा साठी निलंबन करण्यात या संदर्भात

Sudarshan MH
  • Jul 5 2021 5:21PM
*नाशिक महानगर भाजप तर्फे जिल्हाधिकारी नाशिक यांचे मार्फत माननिय राष्ट्रपतीना १२ आमदारांचे निलंबन व २ दिवसात अधिवेशन गुंढाळण्या येणार असल्याने त्या संदर्भात निवेदन*
   *भारतीय जनता पार्टी   नाशिक महानगर तर्फे निषेध....*


                दोन दिवसात महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन गुंडाळण्यात येत असून अधिवेशनात  भाजप च्या १२ आमदारांचे १  वर्षा साठी निलंबन करण्यात या संदर्भात 
नाशिक महानगर भाजप तर्फे जिल्हाधिकारी नाशिक यांचे मार्फत मानानिय राष्ट्रपतीना देण्यात आले  यावेळी भाजप नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून या वेळी निवेदन देताना समवेत प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नाशिक महानगर संघटन सरचिटणीस नगरसेवक प्रशांत जाधव, भाजप जेष्ठ नेते विजय साने, नाशिक महानगर महिला मोर्चा अध्यक्ष हिमगौरी आडके, महिला मोर्चा सरचिटणीस शिल्पा पारनेरकार , पूर्वा सावजी हजर होते.
           उपरोक्त विषयान्वये, महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन केवळ दोन दिवसाचे होत आहे. परंतू हे अधिवेशन लोकशाहीची क्रूर थट्टा करणारे आहे. कारण या अधिवेशनात राज्यासमोरील कोणत्याही महत्वाच्या विषयाची चर्चा होणार नाही. विधिमंडळ सदस्यांना घटनेने दिलेले अधिकार म्हणजेच प्रश्न विचारणे, स्थगन प्रस्ताव देणे, लक्षवेधी सुचना मांडणे इत्यादी सर्व व्यपगत झाले आहे.
            जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्यायला हे सरकार घाबरते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी, नाशिक महानगराच्यावतीने आज दि.५ जुलै २०२१  रोजी महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिन पाळणार आहे. 
            विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, संख्याबळ कमी करण्यासाठी रचलेला हा कुटील डाव म्हणून १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केल्यामुळे या राज्य सरकारचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत असे निवेदनात म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार