सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार... राजेश टोपे

केंद्राने ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला १ एप्रिलपासून सुरुवात होईल असा निर्णय जाहीर केला आहे.

Snehal Joshi. MH
  • Mar 24 2021 6:46AM
 
 
 
 
देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकत्याच झालेल्या व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मागणी केली होती.केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.केंद्राने ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला १ एप्रिलपासून सुरुवात होईल असा निर्णय जाहीर केला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता,सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे.विशेषतः ४५ वर्षांवरील तरूण वर्ग कामासाठी बाहेर असतो,त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्र्यांनी व्हिसीमध्ये सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे.सुरुवातीच्या टप्प्यातही महाराष्ट्र लसीकरणात देशात अव्वलस्थानी होते. आतापर्यंत राज्यात ४५ लाख ९१ हजार ४०१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. ही संपूर्ण माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रपरिषदेत च्या माध्यमातून दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार