सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दक्षिण आफ्रिकेत तिरंगा फडकविणार पहिला आदिवासी गिर्यारोहक ; मात्र खर्चाचा प्रश्न

नंदुरबार : यंदाच्या दक्षिण आफ्रिकेतील किली मांजरो या सर्वोच्च शिखरावर ३६० एक्सप्लोर्सच्या वतीने एव्हरेस्टवीर तथा आंतरराष्ट्रीय शिक्षक आनंद बनसोडे यांच्या टिमसोबत

Nandurbar MH
  • Dec 23 2020 11:32AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार : यंदाच्या दक्षिण आफ्रिकेतील किली मांजरो या सर्वोच्च शिखरावर ३६० एक्सप्लोर्सच्या वतीने एव्हरेस्टवीर तथा आंतरराष्ट्रीय शिक्षक आनंद बनसोडे यांच्या टिमसोबत आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील बालाघाट या छोट्याशा पाड्यातील रहिवासी अनिल मानसिंग वसावे या युवकाची निवड झाली आहे. आदिवासी समाजातील कदाचित तो पहिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक ठरणार आहे.

आवश्य वाचा- धुळ्यात रहिवास अतिक्रमणाचे ड्रोनने सर्वेक्षण

२६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी दक्षिण आफ्रिकेतील किली मांजरो या सर्वोच्च शिखरावर सोलापूर येथील एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांची टिम भारताचा तिरंगा रोवणार आहे.मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेले बालाघाट (ता. अकलकुवा) येथील अनिल वसावे या तरुणाची निवड झाली आहे. आदिवासी समाजातील पहिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक होण्याची संधी वसावे यांना प्राप्त झाली आहे.

...अशी मिळाली संधी
याबाबत श्री. वसावे यांना त्यांच्या इथपर्यंतचा प्रवासाविषयी विचारले असता त्यांनी सांगितले, की लहानपणापासून अतिदुर्गम, डोंगरदऱ्यात वाढलो. त्यामुळे डोंगर-उतार चढणे- उतरणे आमच्यासाठी नित्याचेच झाले. त्यातच माझी सातारा येथे औषध निर्माणशास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली. तेथे असताना मॅरेथॉनमध्ये नेहमी सहभागी व्हायचो. त्यातून आंतरराष्ट्रीय एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी माझ्यातील गुण ओळखले. त्यांनी ऑगस्ट महिन्यात यंदाचा किली मांजरो शिखरावरील मोहिमेसाठी निवड चाचणीत सहभागी होण्याची संधी दिली. त्यात भारतातून टॉप टेनमध्ये माझा समावेश झाला. चाचणीत यश मिळाले.

महत्वाची राजकीय बातमी- सुडाच्या राजकारणावर खडसे काय म्‍हणाले; महाजनांच्या आरोपावरील उत्‍तर वाचा
परिस्थिती हलाखीची
अनिल वसावे यांची घरची परिस्थिती गरिबीची आहे. वडील शेती करतात. लहान भाऊ शिक्षण घेत आहे. स्वतः अनिल मोलगी (ता. अक्कलकुवा) येथे मेडिकल दुकानावर कामाला आहे. त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार