नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहर बस सेवा १ ते १० जुलै २०२१ च्या दरम्यान सुरू
१ ते १० जुलै २०२१ च्या दरम्यान सुरू करण्याचा निर्णय नाशिक मनपा परिवहन सिटीलींक कंपनीच्या ६ व्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मा.आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहर बस सेवा १ ते १० जुलै २०२१ च्या दरम्यान सुरू करण्याचा निर्णय नाशिक मनपा परिवहन सिटीलींक कंपनीच्या ६ व्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मा.आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
मनपाच्या वतीने पहिल्या टप्प्यात ५० बसेस सुरू करण्यात येणार आहेत या अनुषंगाने नाशिक मनपा परिवहन सिटीलींक कंपनीच्या संचालक मंडळाची ६ वी बैठक झाली. या बैठकीस मा.महापौर सतीश कुलकर्णी,उपमहापौर भिकुबाई बागुल,सभागृहनेते कमलेश बोडके,विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते अरुण पवार,शहर अभियंता संजय घुगे,स्मार्ट सिटी चे कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल,मुख्य लेखाधिकारी नरेंद्र महाजन,मुख्य लेखा परिक्षक बी.जे सोनकांबळे, अधीक्षक अभियंता एस एम चव्हाणके, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी,बाजीराव माळी,एस.टी.चे अधिकारी मिलिंद बंड,वसंत गायधनी,राजेश वाघ,रणजित ढाकणे आदी उपस्थित होते.
या बैठकीत कंपनीच्या संचालकपदी सभागृहनेते कमलेश बोडके,गटनेते अरुण पवार यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच एसटीचे विभागीय नियंत्रक राजेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच कंपनीसाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा अधिकारी यांची शासनाकडून नियुक्ती करणेबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.सध्या कंपनीचे मुख्य लेखाधिकारी म्हणून मनपाचे उपमुख्य लेखाधिकारी गुलाबराव गावित यांची तात्पुरती स्वरुपात नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली.या बैठकीत लेखापरीक्षक यांची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली.
बसेसचे मंजूर दराबाबत संचालक मंडळास सविस्तर माहिती देण्यात आली.शहर बसेस संदर्भातील कामाचा आढावा घेवून आत्ताच्या परिस्थितीबाबत सविस्तर माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली त्यात टर्मिनल बांधणे,आय.टी.एम.एस यंत्रणा, बस चालक व वाहक यांची सज्जता या आदी बाबत सविस्तर चर्चा या बैठकीत झाली असल्याची माहिती मा.आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या ९ मार्गास मान्यता दिली आहे.त्यात बदल करणे अथवा नवीन मार्ग निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणास आहेत.नाशिक मनपा परिवहन सिटीलींक कंपनीच्या बसेसचे मार्गावर बसेस १) तपोवन ते बारदान फाटा मार्गे सिव्हील,सातपूर अशोकनगर श्रमिकनगर २) तपोवन सिंबाँयसीस कॉलेज मार्ग पवन नगर उत्तम नगर ३)तपोवन ते पाथर्डी गाव मार्गे द्वारका नागजी,इंदिरानगर,वनवैभव ४)सिंबाँयसीस कॉलेज ते बोरगड मार्गे शिवाजी चौक लेखा नगर महामार्ग मसरूळ बोरगड
५)तपोवन ते भगूर मार्गे शालिमार द्वारका बिटको देवळाली कॅम्प ६)नासिकरोड ते बारदान फाटा मार्गे द्वारका कॉलेज रोड सातपूर व्हीआयपी कार्बन नाका ७)नाशिक रोड ते अंबड गाव मार्गे द्वारका महामार्ग लेखानगर गरवारे ८)नाशिक रोड ते निमाणी मार्गे जेल टाकी सैलानी बाबा नांदूर गाव नांदूर नाका तपोवन ९)नाशिक रोड ते तपोवन मार्गे बिटको द्वारका शालिमार सीबीएस पंचवटी या ९ मार्गावर धावणार असून २४० बस थांबे असणार आहेत.मनपाचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने त्या थांब्याजवळ रिफ्रेशमेंट सेंटर उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे मा.आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प