सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महानगरपालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग त्वरीत द्यावा.

लातूर महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन मिळावा याकरिता मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना प्रत्यक्ष भेट घेवून महाराष्ट्र राज्य नगर परिषद कामगार कर्मचारी संघटनेचे राज्य सल्लागार शिवमुर्ती पवार व अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. अधिक माहिती अशी की, नगर परिषद असतांना 408 कर्मचार्‍यांना अस्थायी म्हणून नेमणूक केली. 25 ऑक्टोबर 2011 मध्ये महापालिका अस्तित्वात आली. त्यानंतर 28 मे 2013 च्या शासन आदेशान्वये 1246 पदाचा अकृतीबंध नवनिर्मित महापालिकेकरिता पदे मंजुर करण्यात आली.

S.n.ranjankar
  • Jan 6 2022 2:51PM
लातूर  महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन मिळावा याकरिता मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना प्रत्यक्ष भेट घेवून महाराष्ट्र राज्य नगर परिषद कामगार कर्मचारी संघटनेचे राज्य सल्लागार शिवमुर्ती पवार व अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. अधिक माहिती अशी की, नगर परिषद असतांना 408 कर्मचार्‍यांना अस्थायी म्हणून नेमणूक केली. 25 ऑक्टोबर 2011 मध्ये महापालिका अस्तित्वात आली. त्यानंतर 28 मे 2013 च्या शासन आदेशान्वये 1246 पदाचा अकृतीबंध नवनिर्मित महापालिकेकरिता पदे मंजुर करण्यात आली.  त्यापैकी वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) यांचे पथक विभागात 849 पदे आहेत. त्यातील 408 कर्मचारी यांचे सप्टेंबर 2019 मध्ये समावेश करण्यात आले. त्यानुसार 408 कर्मचार्‍यांना वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) यांचे पथक क्र.2 असे करून अस्थायी म्हणून 408 कर्मचार्‍यांना पगारपत्रके देत आहेत. याबाबत कर्मचार्‍यांना कसलीही माहिती दिली नाही. आदेशही दिला नाही. आकृतीबंधमध्ये वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) यांचे पथक असे असताना महापालिका क्र.2 अस्थाई समजले जाते. हा अन्याय आहे. असे निवेदनात लेखी दिले आहे. याबाबत संघटनेला त्वरीत माहिती द्यावी व आकृतीबंधमध्ये सर्व अस्थायी 408 कर्मचार्‍यांना वैद्यकीय स्वच्छता पथकमध्ये सामावुन स्थायी करावे व सर्व अस्थायी व 408 कर्मचार्‍यांच्या पाल्यास लाडपागे कमिशनद्वारे नियुक्तीचे आदेश द्यावे संघटनेचे सर्वश्री शिवमुर्ती पवार, जिल्हाध्यक्ष बालाजी कोंबडे, सचिव नारायण(नाना), अध्यक्ष अंकुश गायकवाड आदिंनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार