नवापूर, प्रतिनिधी गणेश वडनेरे ता. १ : आतातरी नाभिक समाजाला सलून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी
तहसीलदार मंदार कुलकर्णी, मुख्याधिकारी महेश चौधरी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना निवेदन देण्यात आले.
नवापूर, प्रतिनिधी गणेश वडनेरे ता. १ : आतातरी नाभिक समाजाला सलून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी. सलून व्यवसायाला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्यात यावे. अशी मागणी तहसीलदार, पालिका मुख्याधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्याकडे नवापूर नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली.
तहसीलदार मंदार कुलकर्णी, मुख्याधिकारी महेश चौधरी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना निवेदन देण्यात आले.
मागिल वर्षी २२ मार्चला जनता कर्फ्यु नंतर लगेच पूर्ण देशात संचारबंदी लागू केली. कालांतराने अत्यावश्यक सेवेसह इतर व्यवसायिकांना व्यवसाय करण्यास मुभा मिळाली. मात्र सलून व्यवसाया सोबत लेडीज जेंट्स पार्लर, स्पा सेंटर यांना मात्र कडक संचारबंदी सूट दिली नाही. यात सर्वसामान्य सलून व्यवसायिक व सलून कारागीर मात्र पुर्णतः उध्वस्त झाला. संचारबंदीच्या काळात नाभिक समाजातील २७ समाज बांधवांनी कोरोना महामारीच्या संकटात आपली जीवनयात्रा संपवली. अर्थात कामधंदा नसल्यामुळे कुटुंबाचे पालनपोषण करणे अशक्य झाले, पोटाची खळगी भरू शकत नसल्याने नाभिक समाजातील सत्तावीस बांधवांनी आत्महत्या केली. तरी देखील या सरकारने या नाभिक समाजाचा विचार केला नाही. हा खूप गांभीर्याचा प्रश्न आहे. आज नाभिक समाजाची अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनकर्ता जमात या अल्पसंख्यांक नाभिक समाजाकडे लक्ष देत नाही. आम्हाला भीक नका देवू आमच्या व्यवसायला परवानगी द्या. हीच तुम्हाला पाया पडून विनंती करतो, जेणे करुन आमच्या प्रपंच चालेल याचा विचार करा. नाभिक समाज बांधव हा भाडेतत्त्वावर दुकाने घेऊन कामधंदा करून पोटाची खळगी भरत आहेत. आज दुकानाचे भाडे सुद्धा देऊ शकत नाही. प्रपंच कुठे चालेल याची दखल शासनाने घेतली पाहिजे. नाभिक समाजाला न्याय दिला गेला पाहिजे. संपूर्ण नाभिक समाज दयनीय परिस्थितीत हलाखीचे जिवन जगत आहे. संसाराचा गाडा कसा चालावा हा प्रत्येक नाभिक समाजाला प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने याची दखल घेऊन सलून व्यवसायाला अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ करून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी.
निवेदन देतांना दुकानदार संघटना अध्यक्ष मुकेश वारूडे, सचिव संजय सोनवणे, सोमनाथ महाले, विनोद सुर्यवंशी, अनिल वारूडे, रविंद्र सोनवणे, गोपी सैन, जितेंद्र वारूडे , अल्पेश सेन, कमलेश हिरे, चेतन महाले, राजेंद्र चीत्त्ते,
उमेश चीत्ते, संतोष मोरे, सिद्धार्थ भदाणे आदी उपस्थित होते.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प