सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वडिलांच्या मृत्यू नंतरही शिक्षिकेने केले निवडणूकीचे शासकीय कर्तव्य*

या आहेत वनिता उत्तमराव गोविंदवार सहाय्यक शिक्षिका केंद्रीय प्राथमिक शाळा मुडाणा,

Sudarshan MH
  • Jan 21 2021 8:06PM
 उमरखेड येथील रहिवासी आणि महागाव तालुक्यातील मुडाणा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे सहाय्यक शिक्षिका या पदावर असलेल्या वनिता उत्तमराव गोविंदवार यांच्या वडीलांचे उत्तमराव बापूराव गोविंदवार शिक्षक मुळावा ता.उमरखेड हल्ली मुक्काम औरंगाबाद यांचे 12 .1 .2021 रोजी निधन झाले पण 15 तारखेला ग्रामपंचायत निवडणूक आहे निवडणूकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे आपण वेळेवर कर्तव्य न केल्यास शासनाला त्रास होईल ह्या हेतूने कर्तव्य पार पाडायचे असा कठोर निर्णय घेतला आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतरही दोन दिवस झाले नसताना काळजावर दगड ठेवून शासकीय मतदानाचे काम करायचे असा कठोर निर्णय घेतला आणि 13 तारखेला उमरखेड येथील तहसील कार्यालयात टपाली मतदान केले व 14 तारखेला महागाव तहसील कार्यालयात केंद्राध्यक्ष मारकड सर, वानखेडे साहेब यांच्यासोबत मतदान पेट्या व मतदानाचे साहित्य घेतले तसेच 15 तारखेला महागाव तालुक्यातील हिवरी या ठिकाणच्या निवडणुकीच्या मतदान केंद्रावर शासकीय कर्तव्य पार पाडले. एकीकडे वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व कुटुंब दुःखातून सावरले नसतात दुसरीकडे शासकीय निवडणूक कार्याचे कर्तव्य करायचे हा मोठा निर्णय घेतला. यासाठी त्यांना केंद्र अध्यक्ष मारकड सर, तसेच वानखेडे साहेब यांनी सहकार्य केले त्याच बरोबर मुडाणा शाळेतील मुख्याध्यापक श्री अवधूत वानखेडे सर, श्री लांडगे सर, सौ लहाने मॅडम, सौ शिंदे मॅडम, यांनी त्यांना धीर दिला एकीकडे वडिलांचा मृत्यू आणि दुसरीकडे मतदानाचे शासकीय कर्तव्य यामुळे खचून न जाता त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले त्यामुळे वनिता उत्तमराव गोविंदवार सहाय्यक शिक्षिका यांचे केंद्रावर सर्वांनी कौतुक केले.
 
प्रतिनिधी किरण मुक्कावार उमरखेड जिल्हा यवतमाळ

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार