सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबार
भारतीय जनता पार्टीने केलेल्या सतत आंदोलनाची दखल घेत गेल्या 7 महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यात शासनाने परवानगी दिली. हे भाजपाचे फार मोठे यश आहे यासंदर्भात नंदुरबार शहरातील श्री गणेश मंदिरात सकाळी महाआरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सपना अग्रवाल, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, मोर्चा प्रदेश सदस्य सविता जयस्वाल, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, अनुसूचित जाति मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष राजेश चौधरी, ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष जितेंद्र राजपूत, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष भूपेंद्र गुरव, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, अध्यात्मिक आघाडी शहराध्यक्ष दिनेश पाठक, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेश कांकरिया, सहकार सेल शहराध्यक्ष रत्नदीप राजपूत, महिला महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम, महिला मोर्चा शहराध्यक्ष योगिता बडगुजर, मुकुंदा ताई जयस्वाल आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.