सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नगरपालिकेच्या महिला नगराध्यक्षा व पन्नास टक्के महिला नगरसेविका असताना घडलेला हा अशोभनीय प्रकार

नवापूर नगर पालीकेचा नियोजन शून्य कारभाराचा हा जीता जागता नमूना बघा खास करून नगरपालिकेच्या नगराध्यक्षा महिला व पन्नास टक्के महिला नगरसेविका असताना

Sudarshan MH
  • Jun 24 2021 12:28PM

नवापूर नगर पालीकेचा नियोजन शून्य कारभाराचा हा जीता जागता नमूना बघा खास करून नगरपालिकेच्या नगराध्यक्षा महिला व पन्नास टक्के महिला नगरसेविका असताना घडलेला हा अशोभनीय प्रकार हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. हा पूर्व पार असलेला समज आहे वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे. शहरी भागात पावसाळ्याच्या दिवसात मोठी हानी होऊ नये म्हणून त्यांची छाटणी करणे हे जरी योग्य असले तरी वटसावित्री पौर्णिमेच्या आदल्या दिवशी वृक्षांची छाटणी करणे व महिलांना पूजा करण्यासाठी सुद्धा जागा उपलब्ध होऊ नये ही मोठी शोकांतिका आहे ऐरवी नगरपालिकेकडून कुठलेही किरकोळ काम होत असताना अथवा गटारीचे कुंडी बनवताना सदर कामाचे श्रेय घेण्यासाठी पूर्ण दिवस नगरसेवक पहारा देत असतात मात्र या वृक्षांची छाटणी होत असताना कुठल्याही नगरसेवकाचे लक्ष असू नये ही मोठी खेदाची बाब आहे वृक्ष छाटणी चा ठेका दिलेल्या ठेकेदाराला जरी वटसावित्री पौर्णिमेचे महत्व माहीत नसले तरी नगरपालिकेच्या सुज्ञ अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना व स्थानिक नगरसेवकांना लोकप्रतिनिधींना ह्या गोष्टीची भनक नसावी सर्वच गोष्टी पैशाने खरेदी करता येत नसतात या बारीक बारीक गोष्टी मतदार हा मत देताना त्याचा जरूर विचार करतो याचे भान ठेवावे माझा हा विषय जरी कोणाच्या मनाला टोचत असेल पण लोकांनी तुम्हाला ह्याच छोट्या-छोट्या सुविधांसाठी निवडून दिलेले आहे हे लक्षात ठेवावे बाबत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया बोलून दाखवल्या

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार