सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्वाभिमानी'च्या ठिय्या आंदोलनाचा दणका

24 नोव्हेंबरपासून जळालेले विद्युत ट्रान्सफार्मर मिळणार बदलून - लेखी अश्वासनानंतर 'स्वाभिमानी'चे आंदोलन स्थगित

Sudarshan MH
  • Nov 23 2020 3:57PM
(योगेश शर्मा)
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील विद्युत ट्रान्सफार्मर साठी 10 हजार 500 लिटर ऑईल मंजूर झाले आहे. 23 नोव्हेंबर पर्यंत हे ऑईल बुलडाण्यात दाखल होवून मंगळवार 24 नोव्हेंबर पासून जळालेले ट्रान्सफार्मर बदलून देण्यास सुरुवात होईल व कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा रब्बीचा हंगाम विजे अभावी वाया जाणार नाही, असे लेखी आश्वासन महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.
     बुलडाणा जिल्ह्यात विद्युत ट्रान्सफार्मरसाठी पुरेसे ऑईल उपलब्ध नसल्याने जळालेले ट्रान्सफार्मर लवकर बदलून मिळत नव्हते. ऐन रब्बीच्या हंगामात ट्रान्सफार्मर जळल्यामुळे शेतकऱ्यांना विज मिळत नव्हती. परिणामी गहू, हरभरा, भाजीपाला व इतर रब्बीची पिके जळू लागली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार होते. ही बाब 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांच्या कानावर शेतकऱ्यांनी घालताच तुपकर यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. तथापि जिल्ह्यात विद्युत ट्रान्सफार्मरसाठी लागणारे ऑईलच उपलब्ध नसल्याचे रविकांत तुपकर यांच्या निदर्शनास अधिकाऱ्यांनी आणून दिल्यानंतर तुपकर यांनी थेट मुंबई गाठत ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांच्या कक्षात जाऊन बसले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी आहे. पण विजे अभावी शेतकरी पिकांना पाणी देऊ शकत नाही. ट्रान्सफार्मरसाठी लागणारे ऑइल गेल्या अनेक दिवसांपासून उपलब्ध नाही. ही बाब गंभीर असून उद्योगांना वेगळा न्याय व जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय हे बरोबर नाही, अशी भूमिका उर्जामंत्र्यांसमोर मांडली. तर बुलडाण्यात 'स्वाभिमानी'चे राणा चंदन यांनी ट्रान्सफार्मरसाठी विज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेवून ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे विज वितरण कंपनीचे अधिकारी अडचणीत आले. रविकांत तुपकर यांनी ना.नितीन राऊत यांची भेट घेताच ना.राऊत यांनी तातडीने बुलडाणा जिल्ह्यासाठी 10 हजार 500 लिटर ऑईल मंजूर करून बुलडाणा जिल्ह्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज कार्यकारी अभियंता नितीन माळोदे व सहाय्यक अभियंता गणेश बंगाळे  यांनी आंदोलनाच्या मंडपात येवून आंदोलनकर्त्याना लेखी पत्र देऊन मंगळवार 24 नोव्हेंबर पासून ट्रान्सफार्मर बदलून देण्यास सुरवात करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर राणा चंदन, डॉ. ज्ञानेश्वर टाले शे.रफिक शे.करीम, नितीन राजपूत, विनायक सरनाईक व शेतकऱ्यांना आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. दरम्यान मंगळवारपासून ट्रान्सफार्मर बदलून देण्यास सुरुवात न झाल्यास आजचे आंदोलन कार्यालयाच्या समोर केले, उद्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा ताबा घेवू असा गंभीर इशारा राणा चंदन, डॉ.टाले, विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी दिला आहे.
   या आंदोलनात महेंद्र जाधव, दत्ता पाटील, हरी उबरहंडे, भागवत धोरण, योगेश महोरे, निलेश वऱ्हाडे, संतोष गवळी यांच्यासह शेतकरी, 'स्वाभिमानी'चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार