सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा चौकशी अहवाल सीबीआयने सार्वजनिक करावा : गृहमंत्री अनिल देशमुख

महाराष्ट्र सरकार या प्रकरणातील सीबीआय चौकशी अहवालाची प्रतीक्षा करत आहे. आम्हाला त्यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

Snehal Joshi .
  • Oct 3 2020 11:51PM
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून हे आत्महत्येचं प्रकरण आहे, असा अहवाल एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयला सोपवला आहे. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया आली आहे. सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूचा चौकशी अहवाल सीबीआयने लवकरच जाहीर करावा. जेणेकरुन हे प्रकरण आत्महत्येचं आहे की हत्येचं हे सर्वांना कळू शकेल, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं. महाराष्ट्र सरकार या प्रकरणातील सीबीआय चौकशी अहवालाची प्रतीक्षा करत आहे. आम्हाला त्यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. जोपर्यंत आम्हाला अधिकृत माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. आम्हाला याविषयी अधिकृत माहिती मिळेल तेव्हा यावर भाष्य करु. मात्र या प्रकरणातील सीबीआय चौकशी अहवाल लवकरच लोकांसमोर यावा, जेणेकरून ही हत्या आहे की आत्महत्या कळलं पाहिजे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार