सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुशांतच्या नव्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली धक्कादायक माहिती...

शनिवारी सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली. सोबतच  सुशांतचा 7 पानांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या पोस्टमार्टम रिपोर्टमधून नवी तितकीच धक्कादायक माहिती समोर आली आहे

Snehal Joshi .
  • Aug 23 2020 7:18PM
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासाने पुन्हा वेग घेतला आहे.  शनिवारी सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली. सोबतच  सुशांतचा 7 पानांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या पोस्टमार्टम रिपोर्टमधून नवी तितकीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. होय, या रिपोर्टमध्ये सुशांतच्या गळ्यावर 33 सेंमी  लांब लिगेचर मार्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य भाषेत लिगेचर मार्क म्हणजे, खोल खूण. सुशांतची जीभ बाहेर नव्हती आली. दात ठीक होते, शरीरावर कोणतीही जखम किंवा खूण नव्हती. रिपोर्टनुसार, सुशांतच्या पापण्या अर्धवट उघडल्या होत्या. शरीरातील कोणतीही हाडं तुटली किंवा मोडलेली नव्हती.रिपोर्टनुसार, तोंडातून किंवा कानातून फेस अथवा रक्त बाहेर आले नव्हते. मात्र मानेच्या खाली 33 सेंटीमीटर लांब लिगेचर मार्क होते. फासाची खूण हनुवटीच्या खाली 8 सेंमी होती. या रिपोर्टनंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी पुन्हा या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत.  सीबीआयने दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांची मदत घेऊन पास्टमार्टम अहवालाची तपासणी केली. सुशांतचा  पोस्टमार्टम  रिपोर्ट पाच डॉक्टरांच्या टीमने लिहिला होता. आता सीबीआय या पाच डॉक्टरांच्या टीमचीही चौकशी करणार आहे. सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम सुरु असताना कथित गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती  जवळपास 45 मिनिटे शवगृहात होती. ती तिथे काय करत होती? सुशांतचा कुठलाही नातेवाईक तिथे नसताना रिया तिथे कशी गेली? याचा तपासही सीबीआय करत आहे. काल सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली. सुशांतच्या घरात पाऊल टाकल्यानंतर सीबीआयचे अधिकारी काही क्षण बुचकळ्यात पडले. कारण सुशांतच्या घरातील जवळपास सर्व वस्तू गायब आहेत. मुंबई पोलिसांच्या परवानगीने घर मालकाने सुशांतचे सर्व सामान काढण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे आता सर्व घर जवळपास रिकामे झाले आहे. दरम्यान, सीबीआय तपासात सुशांतचा पलंग आणि पंख्या दरम्यानची उंची मुंबई पोलिसांनी केलेल्या पंचनाम्या नुसारच आढळून आली आहे.      

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार