सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

फडणवीस जर मुख्यमंत्री असते तर सुशांत केसचा तपास योग्य मार्गानं झाला असता

फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा असती तर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य मार्गानं झाला असता हे तिनं ट्विच्या माध्यमातून म्हंटले आहे

Snehal Joshi .
  • Sep 15 2020 2:02PM
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं काही महिन्यांपूर्वीच मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या करुन जीवन संपवलं. ज्यानंतर त्याच्या आत्महत्येप्रकरणीचा तपास दर दिवशी एका वेगळ्या वळणावर आल्याचं पाहिलं. मुंबई पोलीस, सीबीआय आणि एनसीबी अशा तपास यंत्रणांकडून या घटनेचा तपास करण्यात आला. मुळात सुशांतच्या आत्महत्येनंतर कलाविश्वातील काही अनुत्तरित प्रश्न समोर आले. ज्या प्रश्नांच्या उत्तरासाठी अनेक कलाकार आग्रही असल्याचे पाहायला मिळाले. अभिनेत्री कंगना राणौत हिसुद्धा त्याच कलाकारांपैकी एक.  खुद्द कंगनाने या मुद्द्यावर काही गौप्यस्फोटही केले. इतकंच नव्हे तर, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबत सुरु असणाऱ्या संघर्षादरम्यानच आता पुन्हा एकदा मुंबईतून काढता पाय घेतलेल्या कंगनानं महाराष्ट्र शासनावर टीकेची झोड उठवली आहे.  महाराष्ट्रातील सरकार बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांना पाठिशी घालत असल्याचं म्हणत मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी करणारी कंगना आता थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्याच्या घडीला मुख्यमंत्रीपदाची धुरा असती तर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य मार्गानं झाला असता हे तिनं ट्विच्या माध्यमातून म्हंटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार