सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सीबीआयकडे आदेश सोपवण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय. म्हणाले

मुंबई पोलिसांनी काही चुकीचं केलं आहे असं म्हणता येणार नाही. मात्र बिहार पोलिसांच्या टीमला करण्यात आलेला अडथळा टाळता आला असता.

Snehal Joshi .
  • Aug 19 2020 9:49PM
सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश देताना प्राथमिकदर्शी मुंबई पोलिसांनी कोणतंही चुकीचं काम केल्याचं सूचवत नसल्याचं म्हटलं आहे. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांनी मर्यादित तपास केला असून एफआयआर दाखल केला नसल्याचं न्यायालयाने निदर्शनास आणलं.सर्वोच्च न्यायालयाने यावेळी बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्याच्या मुंबई पोलिसांचा निर्णय अयोग्य असल्याचं सांगत हे टाळता आलं असतं असंही सांगितलं. यामुळे तपासाबाबत संशय वाढल्याने हे टाळता येणं शक्य होतं असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे प्राथमिकदर्शी मुंबई पोलिसांनी काही चुकीचं केलं आहे असं म्हणता येणार नाही. मात्र बिहार पोलिसांच्या टीमला करण्यात आलेला अडथळा टाळता आला असता. यामुळे तपासाबाबत संशयाला जागा मिळाली. मुंबई पोलीस सुशांत प्रकरणी मर्यादित तपास करत होते. सध्याच्या घडीला एफआयआर नोंदवून मुंबई पोलीस इतर बाबींची चौकशी करणार नाहीत असं म्हटलं जाऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार