सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सीबीआयसमोर स्वत: जाणार हा युवा नेता; भाजपाचा आरोप

सुशांतचा कुक नीरज याची चौकशीही करण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडींवर भाजपाचे प्रवक्ते सुरेश नखुआ यांनी एका युवा नेत्याकडे नाव न घेता बोट दाखवत या नेत्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा नेता ईमेज चमकविण्याच्या उद्देशाने मोठ्या तयारीनिशी स्वत: सीबीआयच्या समोर जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Snehal Joshi .
  • Aug 22 2020 8:45PM
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे गेला असून तपास पथकाने महत्वाचे पुरावे, कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. तसेच सुशांतचा कुक नीरज याची चौकशीही करण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडींवर भाजपाचे प्रवक्ते सुरेश नखुआ यांनी एका युवा नेत्याकडे नाव न घेता बोट दाखवत या नेत्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा नेता ईमेज चमकविण्याच्या उद्देशाने मोठ्या तयारीनिशी स्वत: सीबीआयच्या समोर जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नखुआ यांनी कोणाचे नाव घेतले नाही. मात्र, काही विश्वासू सुत्रांनी ही माहिती दिल्याचे ते म्हणाले. या सुत्रांनुसार एक युवा नेता आपली इमेज वाचविण्यासाठी सीबीआयसमोर न बोलाविता जाऊ शकतो. आज किंवा उद्या हा नेता सीबीआय चौकशीसाठी हजर राहू शकतो. यासाठी मोठी प्रसिद्धी मिळविण्यासाठी प्लॅन आखला जात असल्याचे नखुआ यांनी म्हटले.  हा युवा नेता सुशांत प्रकरणात हे सिद्ध करू इच्छित आहे की, त्याने काही केलेले नाही. यामुळे स्वत: सीबीआयच्या समोर हजर झालो. कोणाचे नाव घेत नाही, पण सर्वकाही आपोआपच समोर येईल, असे ते म्हणाले. आतापपर्यंत या केसमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव आलेले नाहीय. सुशांतच्या वडिलांनीही एफआयआरमध्ये कोणा नेत्याचे नाव घेतलेले नाही

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार