सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार शहरात जेंव्हा संपूर्ण पोलीस यंत्रणा एका पोलीस कर्मचारीच्या गाई साठी लावली जाते तेंव्हा

पोलीस कर्मचाऱ्यांच्या एका गाईच्या शोधार्थ तळमळणारे पोलीस जिल्ह्यातील गौ हत्या व तस्करीच्या हजारो घटने बद्दल अनभिज्ञ का ?

Sudarshan MH
  • Jul 7 2020 3:57PM
*पोलीसकर्मचाऱ्याच्या एका गायीच्या शोधार्थ तळमळणारे पोलीस*
*ऊघडपणे चालणाऱी गोवंशकत्तल थांबवण्यासाठी गंभीर का नाही?*
नंदुरबार- गरीब शेतकऱ्यांच्या आधार असलेल्या शेकडो गायींची व गोवंशाची कत्तल रोज चालते तेव्हा गांभीर्याने न घेणाऱ्या पोलिसांनी एका पोलीस कर्मचाऱ्या कडील केवळ एका गायीच्या शोधासाठी मात्र यंत्रणेचे पूर्ण बळ वापरून शोध घेतला. यावर लोकांची चर्चा रंगली असून गरिबाच्या  गायींना वेगळा न्याय आणि पोलिसकर्मचाऱ्या कडील गायीला दुसरा न्याय लावला जात असल्याची टिका होऊ लागली आहे.
सुदर्शन न्यूज ला मिळालेल्या माहितीनुसार येथील पोलीस मुख्यालयात  नियुक्तीला असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याची गाय त्यांच्या राहत्या घराजवळून कोणीतरी चोरून नेली. चोरीस गेलेली ती गाय शोधून काढण्यासाठी पोलिस यंत्रणेने नंदुरबार शहरातील सर्व कसायांचे गल्ली-मोहल्ले तपासून काढले. चक्क अनेक पोलीस कर्मचारी रात्रभर भटकून कसायांना धारेवर धरत चौकशी करीत होते,असे समजते. अखेरीस एका कुरेशी नामक कसायाकडे त्या गायीचे दोन कापलेले पाय आढळून आले आणि गाईची कत्तल झाल्याचे उघड झाले. यावर पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांचे गोमाते वरील हे प्रेम पाहून कोणाही व्यक्तीचा ऊर भरून येईल. एका गाईसाठी पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता अभिनंदनीय म्हटली जात आहे. परंतु त्याच वेळी लोकांना प्रश्न पडला आहे की, या एका गाईसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावणारे पोलीस अधिकारी रात्रंदिवस चालणाऱ्या अन्य गोवंशाला वाचवण्यासाठी तत्परता का दाखवत नाही? अवैधपणे अत्यंत क्रूर पद्धतीने चालणारी गोवंशाची वाहतूक कोरोना काळातसुद्धा लॉक डाउन असतानासुद्धा बिनदिक्कत चालू होती. त्यावेळी एवढ्या तत्परतेने कायदे नियम का वापरले नाही? सुदर्शन न्युज  आज  याविषयी जाहीरपणे  प्रश्न उपस्थित करीत आहे  की,  गरिबांच्या गरीबांच्या गाईंना एक न्याय आणि पोलिसाच्या गाईसाठी वेगळा न्याय अवलंबला जात आहे का?  गोवंश हे गरीब शेतकऱ्यांचा आधार असतात. मात्र त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन गुरे आजारी असल्याचे बनावट कागदपत्र बनवून खरेदी विक्री केली जाते आणि क्रूर पद्धतीने कोंबून नंदुरबार मध्ये वाहून आणले जातात नंतर सर्रास त्यांची कत्तल केली जाते. नंदुरबारमध्ये हे उघड गुपित आहे. विशिष्ट हेतूने या उघड चालणाऱ्या अवैध गोष्टींकडे पोलीस दुर्लक्ष करतात काय?  मागील महिन्यात नंदुरबार शहरातील लग्नाच्या मेजवानीत कोरोना ग्रस्त खानसामाच्या माध्यमातून संसर्ग झाल्या विषयी आणि  जबाबदार अधिकाऱ्यांकडून  उल्लंघन झाल्याकडे सुदर्शन न्युज चॅनेलने लक्ष वेधले होते. तेव्हाही गुन्हा नोंदवताना आणि तपास करताना सामान्य जनतेला लावले जाणारे कायदे नियम राजकीय व प्रशासकीय लोकांना लावले जात नाही असे निदर्शनास आले होते. नंदुरबार वासियांना ते उघडपणे पाहायला मिळाले होते. आता या गाईच्या प्रकरणात सुद्धा तेच सूत्र समोर आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार