सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुदखेड तालुक्‍यातील विविध कामकाजांची पाहणी नांदेड जिल्हा परिषदेच्या सी ई ओ वर्षा ठाकूर यांनी केली पाहणी

नांदेड जिल्हा परिषदेच्या सी ई ओ वर्षा ठाकूर यांनी केली पाहणी

Sudarshan MH
  • Oct 23 2020 1:20PM
नांदेड दि.२३(अरविंद जाधव)जिल्‍हा परिषदे अंतर्गत चालणा-या विविध विकास योजनांची जनजागृती करण्‍यासाठी सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी पुढाकार घेऊन सकारात्‍मक कामे करावीत असे आवाहन नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. आज गुरुवार दिनांक 22 ऑक्‍टोबर रोजी मुदखेड तालुक्‍यात दौरा करुन प्राथमिक आरोग्‍य केंद्र, पशूवैद्यकीय दवाखाना, ग्राम पंचायत व पंचायत समितीला भेट देऊन त्‍यांनी कामकाजाची पाहणी केली त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या.

पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, सध्‍या कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी आपल्‍या यंत्रणे अंतर्गत मोठया प्रमाणात उपाययोजना केल्‍या जात आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत गावातील प्रत्येक नागरीकांपर्यंत आरोग्यविषयक खबरदारीच्‍या सूचना देऊन मास्‍क वापरणे, वेळोवेळी साबनाने हात धुने व दोन व्‍यक्‍तींमधील सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या.

मुगट येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात सुमारे दोन तासांची भेट देऊन बाळांत कक्ष, शस्‍त्रक्रीया विभाग, बाहयरुग्‍ण विभाग, कोरोना विलगीकरण कक्ष आदी विविध कक्षांची त्‍यांनी पाहणी करुन केंद्राच्‍या कामकाजाबद्दल समाधान व्‍यक्‍त केले. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्‍याहस्‍ते प्राथमिक आरोग्‍य केंद्रात वृक्ष लागवड करण्‍यात आली. यावेळी ग्राम पंचायतीला भेट देऊन आपले सेवा सरकार, कर वसूली, पाणी जलशुध्‍दीकरण यंत्र, विंधन विहिर तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाविषयी प्रत्‍यक्ष पाहणी करुन माहिती घेतली.

यावेळी सीईओ यांनी पशूवैद्यकीय दवाखाण्‍यास भेट दिली. यावेळी वन विभागामार्फत उपचारासाठी पशूवैद्यकीय दवाखाण्‍यात दाखल करण्‍यात आलेल्या हरणाच्या तब्‍येतीची मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी विचारपूस केली. कुत्र्याने हल्‍ला केल्‍यामुळे हरीण जखमी झाल्यामुळे त्‍यावर उपचार सुरु आहेत. या हरणावर योग्‍य ते उपचार करावेत अशा सूचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या. इजळी येथील पशूवैद्यकीय विभागामार्फत सुरु असलेल्‍या लाळया खरखूद रोगाची लसीकरण आणि पशू आधार नोंदणी व टॅगींग याचे प्रत्‍यक्ष पाहणी केली. यावेळी मुदखेड तालुक्‍याच्‍या दौ-यात प्रभारी जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी प्रविण मुंढे, गट विकास अधिकारी एम.डी.जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र पवार, डॉ.संजय कासराळीकर, जिल्‍हा परिषद सदस्‍या अरुणाताई भिमराव कल्‍याणे, डॉ.अरविंद गायकवाड, डॉ.प्राणहंस कांबळे, डॉ.बुचन्‍ना बुच्‍चलवार आदींची उपस्थिती होती.

विद्यार्थीनींशी संवाद 
कोरोनामुळे शाळा बंद असल्‍या तरी ऑनलाईन शिक्षण पध्‍दती सुरु आहे. मुगट येथील दौ-यात मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी इयत्‍ता सहावी व दहावी वर्गातील विद्यार्थीनींशी संवाद साधला. यावेळी त्‍यांनी अभ्‍यासाविषयी आस्‍थेवाईक चर्चा करतांना गणित व इंग्रजी विषयासंदर्भात विद्यार्थींनींना मार्गदर्शन केले.

पिकांची पाहणी 
मुदखेड तालुक्‍याती दौ-या दरम्‍यान मुगट येथील शेत-यांच्‍या शेतामध्‍ये जाऊन त्‍यांनी कापूस, हळद, केळी व इतर पिकांची पाहणी केली. तसेच अतिवृष्‍टीमुळे झालेल्‍या नुकसानीची त्यांनी यावेळी माहीती घेतली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार