सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा;- अंबाळा येथील सरपंच जयश्री पवार यांनी शासनाकडे केली मागणी`

अंबाळा येथील सरपंच जयश्री पवार यांनी शासनाकडे केली मागणी

Sudarshan MH
  • Oct 22 2020 10:39AM
हदगाव दि.२२(अरविंद जाधव) हदगाव तालुकाच नव्हे तर सबंध महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हातातोंडाशी आलेला घास 100% वाया गेलेला आहे. त्यामुळे बळीराजा कमालीचा हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे ,असल्या कठीण समय प्रशासनाने व शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. तालुक्यात अतिवृष्टीने खरीप हंगाम १००% वायाच गेला आहे. पहिले दुबार पेरणीचे संकट व आता अस्मानी संकटाचा मुकाबला बळीराजा करीत आहे. अजूनही पावसाची शक्यता आहे, त्यामुळे हदगाव तालुकाच नव्हे तर सबंध महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी हदगाव तालुक्यातील मौजे अंबाळा येथील सरपंच जयश्री पवार यांनी शासनाकडे केली आहे. ही आता शासनाची पंचनामे करण्याची वेळ नाहीये इतर कुठली वेळ वाया न घालता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 50 हजार रुपयाची तात्काळ मदत करण्याची मागणी जयश्री पवार यांनी केली. कोरोना संकटामुळे शेती आणि शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे कोरोनाच्या काळात सर्व व्यवसाय आणि उद्योग बंद असताना शेतकरी रानात राबत होते व आजही आहेत. खरीप हंगाम चांगला जाईल अशी शक्यता निर्माण झाली होती पहील्या टप्यात पाऊसही चांगला पडला सोयाबीन, कापूस,मूग,उडीद या उत्पादनही जोरदार येण्याची शक्यता निर्माण झाली मात्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन वाया गेले ही सर्व पिके पाण्याखाली आहेत त्याची काढणी करणेही शक्य नाही.म्हणजेच शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.शेतकरी अति पावसामुळे अडचणीत सापडला आहे . त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत तात्काळ करावी असा ठराव ग्रामपंचायत अंबाळा सरपंच सौ.जयश्री श्रीहरी पवार यांनी घेऊन शासनाकडे पारित केला आहे.त्याच बरोबर ओला दुष्काळ जाहीर करून रब्बी हंगामासाठी बी- बियाणे खते याचा मोफत पुरवठा करण्यात यावा असेही सरपंच सौ जयश्री श्रीहरी पवार यांनी शासनदरबारी मागनी केली असुन अनेक शेतकरीही शामील होउन मदतीची मागनी करताना दीसत होते त्यामधे अंबाळा,डोगंरगाव,मार्लेगाव,
सावरगाव,उचाडा,करमोडी, शीवदरा, पीपंरखेड, चीचंगव्हान,कवाना,चोरंबा, केदारनाथ,गारगव्हान,पीगंळी, माळझरा,गुरफळी, मार्लेगाव,हडसनी,सरपंच,पोलीस पाटील, यांनीही आपापल्या ग्रामपंचायतीचे ठराव देऊन शासन दरबारी मागणी केल्याने शेतकरी वर्गात आशेचा कीरन दिसत असल्याचे बोलल्या जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार