सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी घेतले माहुरगडाचे पायरी दर्शन

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी

Sudarshan MH
  • Oct 21 2020 11:38AM
हिंगोली /नांदेड दि.21(अरविंद जाधव):  अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी माहूर ,किनवट दौऱ्यावर असलेल्या खासदार हेमंत पाटील यांनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र रेणुका माता माहूर  गडाच्या पायरीचे दर्शन घेतले.व मतदारसंघावरील संकट दूर करण्याचे साकडे घातले .माहूर येथील रांगोळी कलाकाराने मंदिर परिसरात काढलेल्या सुंदर रांगोळी चे कौतुक करून कलाकाराच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
       कोरोना  विषाणू च्या वाढत्या प्रदूर्भवामुळे देशभरातील मंदिर आणखी खुले करण्यात आले नाहीत. त्यामुळे भाविकांना बाहेरूनच मंदिराबाहेरून देव दर्शन करावे लागत आहे.खासदार हेमंत पाटील यांनी सुद्धा सर्व शासकीय नियमाचा आदर करत  पायरी दर्शन घेऊन याचा प्रत्यय दिला. अतिवृष्टीमुळे  मतदार संघातील सर्वच तालुक्यात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खासदार हेमंत पाटील हे मागील दोन दिवसापासून  हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत.त्यादरम्यान किनवट,माहूर तालुक्यात पाहणी करताना त्यांनी महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती  पीठांपैकी एक असलेल्या  रेणुका  मातेच्या माहूर गडाला भेट दिली . यावेळी मंदिर बंद असल्याने  पायरीचे दर्शन घेऊन मतदार संघावर आलेले  अतिवृष्टीचे  संकट दूर करून  सर्वाना या संकटातून मुक्त करण्याचे साकडे घातले . माहूर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने या भागाच्या  सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने  सदैव प्रयत्न केले जातील, तीर्थक्षेत्राबरोबरच या भागातील पर्यटन वाढीला सुद्धा चालना  दिली जाईल असेही खासदार हेमंत पाटील यावेळी म्हणाले . नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर माहूर गडावर दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु यंदा  कोरोनामुळे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे गडाच्या   पायथ्याशीच  अनेक कलावंत रेणुका मातेची सेवा करत आहेत.  माहूर येथील  रांगोळी कलाकार  सुरेश आराध्ये  यांनी रांगोळीच्या माध्यमातून समर्पक रंग वापरून जगन्मातेची महती रेखाटली होती कलावंताच्या हातातील  हि जादू पाहून खासदार हेमंत पाटील  अवाक झाले त्यांनी कलावंताचे कौतुक करून कलेला मनापासून दाद दिली . यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे,भाजपाचे अँड.रमण जायभाये, देवकुमार पाटील, तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक, गटविकास अधिकारी म्हात्रे, तहसिलदार वरंणगावकर तालुका कृषी अधिकारी मुंढे व इतर मान्यवर मंडळी व पदाधिकारी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार