सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्य अभियता पद भरती घोटाळा दडपण्याच्या हालचालींना वेग मर्जीतील कंत्राटदार व वीज केंद्रातील सप्लायर सरसावले

मर्जीतील कंत्राटदार व वीज केंद्रातील सप्लायर सरसावले

Sudarshan MH
  • Oct 20 2020 12:16PM

महानिर्मिती कंपनी अंतर्गत झालेल्या मुख्य अभियंता पद भरती घोटाळ्यात मुख्य अभियंता पदावर वर्णी लागण्यासाठी "अर्थपूर्ण" संबंध असलेल्या दिग्जजांनी मुख्य अभियंता पद भरती प्रक्रियेत घोटाळा केला घोटाळा राज्यात गाजत असतांना दडपण्याच्या हालचालींना वेग आला काही मर्जीतील कंत्राटदार  सप्लायर पुढे सरसावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महानिर्मिती कंपनी अंतर्गत मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती "२०१७" प्रक्रिया २२ में २०१७ रोजी राबविण्यात आली मात्र निवड समितीने पात्र उमेदवारांला डावलून खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत मुख्य अभियंता यांची १० गुण वाढवून नियमबाह्य मुख्य अभियंता पदावर निवड केली यासंदर्भात वादळ उठल्यानंतर चौकाशी समिती स्थापन करण्यात आली चौकाशी अहवालात चुकीच्या पध्द्तीने निवड करण्यात आल्याचे मान्य करण्यात आले त्यामूळे महानिर्मिती कंपनी कडून झालेली चूक दुरुस्त करणार असल्याची माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी दिली मात्र मुख्य अभियंत्यावर कोणती कार्यवाही करणार हे गुलदस्त्यात आहे यादरम्यान माहितीच्या अधिकारात मुख्य अभियंता पद भरती घोटाळ्यात १० गुण वाढवून मुख्य अभियंता पदावर नियमबाह्य निवड केल्याची माहिती उघड झाली आहे "मुख्य अभियंता सरळसेवा भरती-२०१७" प्रक्रियेत मुख्य अभियंता पदावर वर्णी लावण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली शिवाय "अर्थ" पूर्ण ताकद लावण्यात आल्याची माहिती सूत्रांची आहे निवड समितीने विशेष मेहरबानी करून पात्र उमेदवारांना डावलून खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत मुख्य अभियंत्यांची मुख्य अभियंता पदावर निवड केली त्यामूळे दोषींवर कार्यवाही करने अपेक्षित आहे मात्र काही मर्जीतील कंत्राटदार व वीज केंद्रातील सप्लायर मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती प्रक्रियेत नियमबाह्य निवड झालेल्या मुख्य अभियंत्याला वाचविण्यासाठी "अर्थ" पूर्ण ताकद लावत आहे त्यामूळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बाक्स
वीज केंद्रात कार्यरत कंत्राटदाराना वेठीस धरण्याचा प्रयत्न
खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात विविध कामांचे वर्क ऑर्डर  कंत्राटदारांना देण्यात आले आहेत सदर कंत्राट सुरू करण्यासाठी तात्पुरते एलओआय देण्यात आलेत कंत्राटी कामगारांचे वेतन देण्यात आलेत मात्र  कंत्राटदाराला मिळालेल्या कंत्राटाचे पिओ देण्यात आले नाहीत पिओ मिळाल्या शिवाय सदर कंत्राटदारांना बिले सादर करता येत नाही खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात  पॉकेट संस्कृती आहे व्याजाने पैसे काढून कंत्राटदार कामगारांचे वेतन, २०% पूरक भत्ता देत आहे मात्र पॉकेट संस्कृती असल्यामुळे कंत्राटदारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्या जात आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार