सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

समाजातील युवकांनी परंपरागत व्यवसाचा आधुनिक पध्दतीने विकास करावा

कुंभार प्रशिक्षण वर्गाचा समारोप

Sudarshan MH
  • Oct 20 2020 10:35AM
नागपूर, 16 ऑक्टोबर
कुंभार समाजातील युवकांनी आपल्या परंपरागत व्यवसायाचा आधुनिक पध्दतीने विकास करावा. त्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग व एमएसएमईची मदत मिळू शकते, अशा भावना कुंभार प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेल्या वक्त्यांनी व्यक्त केल्या. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप नुकताच पार पडला.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनाला ना. गडकरी यांनी मार्गदर्शन केले होते. त्यावेळी खादी ग्रामोद्योग आयोग व एमएसएमई मार्फत या समाजाच्या युवकांना शक्य ती मदत करण्याचे आश्वासनही दिले होते. नागपूर जिल्ह्यात खादी ग्रामोद्योग आयोगामार्फत कुही तालुक्यातील चाफेगडी आणि सावनेर तालुक्यातील खापा येथे कुंभार प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही प्रशिक्षण वर्गात 100  वर युवक व महिलांनी सहभाग घेतला होता. खादी ग्रामोद्योग आयोग आणि भारतमाता लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त वतीने हा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. या सर्वाना पॉटरव्हील 10 टक्के रक्कम घेऊन देण्यात आले. 90 टक्के रक्कम ही खादी ग्रामोद्योग आयोगाने सबसिडीच्या स्वरूपात दिली. याशिवाय 10 प्लंजरही समाजाच्या युवकांना देण्यात आले.
या शिबिरात मार्गदर्शन करताना चारूदत्त बोकारे म्हणाले- कुंभार समाजातील युवकांनी आपला परंपरागत व्यवसायाचा अधिक विकास करून रोजगार निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. मातीच्या आकर्षक डिझाईनच्या भांड्यांना बाजारात प्रचंड मागणी आहे, हे युवकांनी लक्षात घ्यावे. मातीच्या भांड्यांचे मूल्यवर्धन केले तर रोजगार निर्मितीसोबत अधिक नफाही मिळविणे शक्य होणार आहे. या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उद्योगाचा योग्य विकास शक्य असल्याचेही ते म्हणाले.
पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणारी मातीची सुरई, चहा पिण्यासाठी वापरण्यात येणारे कुल्हड, मातीच्या भांड्यांना विविध रंग देऊन त्यांच्यात निर्माण होणारा आकर्षकपणा ग्राहकांनाही आकर्षक करू शकतो. तसेच विविध प्रदर्शनांमध्ये युवकांनी सहभागी होऊन मातीचे तयार केलेले विविध साहित्य लोकांसमोर येईल व या कलेला अधिक वाव मिळेल असेही बोकारे म्हणाले.
खादी ग्रामोद्योग आयोगाचे सहसंचालक राजेंद्र खोडके यांनी खादी ग्रामोद्योगच्या योजनांचा कुंभार समाजाच्या युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. मातीच्या आकर्षक वस्तू बनविण्यासाठी हा विभाग सहाय्य करण्यास तयार आहे. तसेच कुंभार प्रशिक्षण वर्ग विदर्भात राबविण्यात येत असून युवकांनी प्रशिक्षण वर्गासाठी एकत्र येऊन संघटित व्हावे व नवीन तंत्राचा वापर करून विकास साधावा असेही खोडके म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतमाता लोकसेवा प्रतिष्ठानचे अमोल ठाकरे यांनी तर संचालन कुंभार समाजाचे प्रतिनिधी गोपालजी बनकर यांनी, आभार उध्दव चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद गधाटे, रितेश काशीकर, राजेश पुरोहित, किशोर दळवी, सौ. अनिता काशीकर, अमर धानोरे, सुरेश सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार