जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली झाली असून आर. बी. भोसले
आता नगरचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत. महाराष्ट्रातील
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यात नगरचे जिल्हाधिकारी म्हणून भोसले यांची नियुक्ती झाली आहे. द्विवेदी यांना अद्याप कोणत्या ठिकाणी नियुक्ती दिली ते कळू शकले नाही.