सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महिलेने दिला तिळ्यांना जन्म; बाळ अन् बाळंतीण सुरक्षीत

जन्म; बाळ अन् बाळंतीण सुरक्षीत

Sudarshan MH
  • Oct 18 2020 2:16PM
९ ऑक्टोबरला तिळ्यांना जन्म दिला. त्यात दोन मुले आणि एक मुलगी आहे.

  
नांदेड दि.१८ (अरविंद जाधव) जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पाथरड येथील एका महिलेने शहरातील एका खासगी रुग्णालयात तिळ्यांना जन्म दिला. बाळ आणि बाळंतीन सुखरूप असून तालुक्यात पहिल्यांदाच तिळ्यांचा जन्म झाला आहे. 

पाथरड ता.हदगाव जि.नांदेड येथील ज्योत्स्रा माधवराव पवार ही महिला प्रसूतीसाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. त्यांनी ९ ऑक्टोबरला तिळ्यांना जन्म दिला. त्यात दोन मुले आणि एक मुलगी आहे. नवजात बाळ आणि आई सुखरूप असल्याचे डॉ. प्रीती जयस्वाल यांनी सांगितले. तालुक्यात पहिल्यांदाच एखाद्या महिलेने तिळ्यांना जन्म दिल्याचे सांगितले जाते. 


ज्योत्स्ना यांचे पती शेतकरी आहे. या दाम्पत्याला यापूर्वीच तीन मुली आहे. प्रसूतीसाठी त्यांनी उमरखेडला धाव घेतली होती. अत्यंत कठीण परिस्थितीत डॉक्टरांनी ज्योत्स्ना पवार यांची सुखरूप प्रसूती केली. त्यामुळे डॉक्टर व सहायकांचे कौतुक होत आहे. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असून आता त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार