सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठा आरक्षण प्रश्न व नोकर भरती थांबवावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने पालकमंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या घरासमोर जागर आंदोलन करण्यात आले

अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या घरासमोर जागर आंदोलन करण्यात आले

Sudarshan MH
  • Oct 16 2020 11:24AM
नांदेड दि. 16 (अरविंद जाधव) -
मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठवावी तसेच नोकर भरती थांबवावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या घरासमोर जागर आंदोलन करण्यात आले. सत्तेतील आणि विरोधी पक्षातील झोपलेल्या लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी हे जागर आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात असून सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. या स्थगितीला पूर्णपणे राज्य सरकार व मराठा आरक्षण कृती उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हे जवाबदार आहेत. तसेच केंद्र सरकारनेसुद्धा राज्यात स्वपक्षाचे सरकार नसल्याकारणाने राज्य सरकारला सहकार्य केले नसल्याने मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले, असा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी केला. येणाऱ्या काळात मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या मागणीचे निवेदन जागर आंदोलन करून माजी मंत्री  डी पी सावंत  व आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांना देण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम व दक्षिण जिल्हाध्यक्ष तिरूपती पाटील भगनुरे  बाला पाटील कदम  हनुमंत पाटील वाडेकर , मंगेश पाटील कदम शिवाजी जाधव ,छावा क्रांतीवीर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे धर्मवीर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळा पाटील जाधव लक्ष्मण पाटील मोरे छावा स्मरीक संघटनेचे विभागीय अध्यक्ष भास्कर हंबर्डे व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देऊन आपले मनोगत व्यक्त करून सकल मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या. तब्बल 6 तास तळपत्या उन्हात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे छावे हे मंत्री महोदयांची प्रतीक्षा करत होते. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर , प्रदेश कोषाध्यक्ष गजानन पाटील माने कार्यकारी सदस्य मंगेश पाटील कदम, प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटील कदम, प्रशांत पाटील मुळे विदर्भ संपर्कप्रमुख शिवाजी जाधव जिल्हा संपर्कप्रमुख बालाजी कराळे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, दक्षिण जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील भगनुरे, उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाला पाटील कदम दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील वाडेकर
महानगराध्यक्ष किरण पाटील गव्हाणे
 वि.आ.जिल्हाध्यक्ष शैलेश पाटील, गणेश कल्याणकर, वैभव पाटील राजूरकर, जिल्हा सचिव संभाजी पाटील जाधव, राज पाटील शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील घोगरे, जिल्हाउपाध्यक्ष माधव वडवळे, माधव पाटील डाकोरे तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड हदगाव तालुका अध्यक्ष संदीप पाटील आढाव देगलूर तालुकाध्यक्ष शशांक पाटील मुजळगेकर गजानन पाटील सांगवीकर धर्माबाद तालुका अध्यक्ष पंडित पाटील जाधव उमरी तालुकाध्यक्ष अविनाश पाटील हिवराळे बिलोली तालुकाध्यक्ष दत्ता पाटील जाधव नायगाव तालुका अध्यक्ष किरण पाटील जिगळेकर बजरंग जिगळेकर महानगराध्यक्ष वि.आ. अनिल पाटील तेलंग, शहराध्यक्ष श्री पाटील खराणे, शहर उपाध्यक्ष शुभम घोरबांड, तालुकाध्यक्ष विशाल इंगळे, योगेश पाटील शिंदे, विश्वजीत पाटील गजानन सोळंके अमोल वानखेडे कृष्णा ग्रामकर  व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार