सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देशाचा औषधनिर्मिती उद्योगांना सुगीचे दिवस काय म्हणत केंद्र सरकार

जगभरातील विविध देशांमध्ये भारतातून २० अब्ज डॉलरच्या 'फार्मा

Sudarshan MH
  • Oct 16 2020 10:21AM
 जगभरातील विविध देशांमध्ये भारतातून २० अब्ज डॉलरच्या 'फार्मा' उत्पादकांची निर्यात केली जाते. देशाचा औषधनिर्मिती उद्योगांना सुगीचे दिवस 
२०२४4 पर्यंत ६५ अब्ज डॉलरपर्यंत पोहचण्याची शक्यता; केंद्रीय मंत्र्यांचा दावा 

नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर

देशातील औषधनिर्मिती उद्योग क्षेत्रातून दरवर्षी अमेरिका, यूरोप सारख्या उच्च मापदंड असलेल्या देशांसह जगभरातील विविध देशांमध्ये भारतातून २० अब्ज डॉलरच्या 'फार्मा' उत्पादकांची निर्यात केली जाते. २०२४ पर्यंत देशातील औषधनिर्मिती उद्योग ६५ अब्ज डॉलर पर्यंत पोहचू शकतो, असा दावा केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डीव्ही सदानंद गौडा यांनी केला आहे. फिक्की तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 
कोरोना महारोगराईच्या सुरुवातीच्या काळात आपत्कालीन स्थितीत 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीन' (एचसीक्यू) तसेच 'एजिथ्रोमाईसिन' या औषधांचा रुग्णांच्या उपचारासाठी मंजूरी देण्यात आली.  १२० हून अधिक देशांमध्ये या औषधांचा पुरवठा करीत भारताने विश्वसार्ह औषधी पूरवठादार देशाच्या रुपात जगभरात ख्याती मिळवली आहे. जेनेरिक औषध निर्माता तसेच पुरवठादार देशांच्या यादीत भारताचा क्रमांक लागतो. अमेरिकेबाहेर यूएसए-एफडीए चे पालन करीत सर्वाधिक ‘फार्मा प्लान्ट’ केवळ भारतात आहे.
देशात सात 'मेगा पार्क' विकसित करण्याची योजना केंद्राने सुरु केली आहे. यातील तीन 'बल्क ड्रग पार्क' तसेच चार 'मेडिकल डिव्हाईस पार्क' विकसित केले जातील. नवे उत्पादक प्रोडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह (पीएलआय) योजनेकरीता पात्र राहतील. यापूर्वी ५ ते ६ वर्षांच्या विक्रीच्या आधारे ते आर्थिक प्रोत्साहनाकरीता पात्र राहत होते.  औषध निर्माता उद्योग क्षेत्राला विक्री आधारीत आर्थिक प्रोत्साहन देण्याचा विचार केंद्राकडून सुरु असल्याचे ते म्हणाले. रासायनिक औद्योगिक क्लसटर ला मजबूत करण्यासाठी केंद्राकडून धोरणात बदल केला जात असल्याचेही गौडा यांनी स्पष्ट केले. 

गतवर्षी ७.५ दशलक्ष टन यूरियाची आयात 
खतेनिर्मिती क्षेत्राच्या विकासातही भारताला मोठी संधी आहे. देशभरातील शेतकर्यांकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात खतांची मागणी केली जाते. पंरतू, देशांतर्गत उत्पादक शेतकर्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यात समर्थ ठरत नाहीत, अशी खंत गौडा यांनी व्यक्त केली. यूनिया तसेच पी अँड खतांचा भारत मोठा आयातदार देश आहे. २०१८-१९ मध्ये भारताने ७.५ दशलक्ष टन यूरिया, ६.६ दशलक्ष टन डीएपी,  ३ दशलक्ष टन एमओपी तसेच ०.५ दशलक्ष टन एनपीके ची आयात करण्यात आली होती असे गौडा म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार